महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर कैजाद कपाडिया यांचे निधन, टायगर श्रॉफने वाहिली श्रध्दांजली - ई टीव्ही भारत बातम्या

सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर आणि टायगर श्रॉफचे मार्गदर्शक कैजाद कपाडिया यांचे यांचे बुधवारी हृदयविकारामुळे निधन झाले.चाहत्यांमध्ये ऍक्‍शन हिरो म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केलेल्या टायगरच्या फिटनेस जडणघडणीत कैजाद यांचा मोठा वाटा होता.

सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर कैजाद कपाडिया यांचे निधन
सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर कैजाद कपाडिया यांचे निधन

By

Published : Oct 14, 2021, 5:36 PM IST

मुंबई - सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर आणि टायगर श्रॉफचे मार्गदर्शक कैजाद कपाडिया यांचे यांचे बुधवारी हृदयविकारामुळे निधन झाले. त्यांच्या निधनाने बॉलिवूड सेलेब्रिटीजमध्ये शोक व्यक्त केला जात आहे. अनेकांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे.

कैजाद यांच्याकडून फिटनेसचे धडे गिरवलेल्या अभिनेता टायगर श्रॉफ याने आपल्या गुरुंना श्रध्दांजली वाहिली. त्यांच्या निधनाने टायगरचे मोठे नुकसान झाले आहे. जबरदस्त स्टंटच्या मदतीने चाहत्यांमध्ये ऍक्‍शन हिरो म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केलेल्या टायगरच्या फिटनेस जडणघडणीत कैजाद यांचा मोठा वाटा होता.

मुंबईतील के ११ अकॅडमी ऑफ फिटनेस सायन्सेसचे कैजाद कपाडिया हे मालक होते. त्यांच्या फिटनेस सेंटरवर शरीरसौष्ठवासोबतच चपळतेचे, साहसाचे, संतुलित आहाराचे घडे दिले जायचे. याचा मोठा लाभ फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्यांना होत आला आहे. त्यामुळे त्यांच्या जिममध्ये मेहनत करणाऱ्या सर्वांनाच त्यांच्या निधनाने धक्का बसला आहे.

हेही आहे - अभिनेत्री नोरा फतेही 'ईडी' कार्यालयात दाखल, जॅकलीन फर्नांडिस उद्या लावणार हजेरी

ABOUT THE AUTHOR

...view details