महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सेलिब्रेटींवर दबाब टाकून ट्विट करायला भाग पाडले असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे - उदय सामंत - मंत्री उदय सामंत बातमी

शेतकरी आंदोलनासंदर्भात सेलिब्रिटींनी ट्विट केले आहेत. ट्विट करण्यासाठी सेलिब्रिटींवर दबाव टाकला असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे, असे मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं आहे.

minister uday samant
मंत्री उदय सामंत

By

Published : Feb 8, 2021, 7:53 PM IST

Updated : Feb 8, 2021, 8:12 PM IST

मुंबई -शेतकरी आंदोलनासंदर्भात सेलिब्रिटींनी ट्विट केले आहेत. ट्विट करण्यासाठी सेलिब्रिटींवर दबाव टाकला असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे, असे मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं आहे. कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांचे दिल्लीच्या सीमांवर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आंतरराष्ट्रीय गायिका रेहनासह काही आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी या आंदोलनाला समर्थन दर्शवून आंदोलनाचा सहानुभूतीने विचार करावा अशे ट्विट केले होते.

मंत्री उदय सामंत

हेही वाचा -मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात किरीट सोमैयांची आयकर विभागात तक्रार

रेहनाच्या ट्विटनंतर भारतीय सेलेब्रिटी आणि खेळाडूंनी हा आमच्या देशाचा अंतर्गत प्रश्न असून, बाहेरील लोकांनी यावर ढवळाढवळ करू नये, असे ट्विट केलेत. मात्र, हे ट्विट सेलिब्रिटीनी भाजप सरकारच्या दबावापोटी केले असल्याचा संशय सचिन सावंत यांनी व्यक्त करून यांसंबंधी चौकशी करण्याची मागणी गृहमंत्री अनिल देशुमुख यांच्याकडे केली. त्यानंतर गृहमंत्री यांनी यासंबंधी गुप्तहेर विभागाकडून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

भारतरत्नांची चौकशी करण्याचा राज्य सरकारचा निर्णय संतापजनक - आशिष शेलार

भाजप नेते आशिष शेलार

सेलिब्रिटींची चौकशीचे आदेश दिल्यानंतर भाजपने याचा कडाडून विरोध केला आहे. तसेच हा निर्णय संतापजनक असल्याचं मत भाजप नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केले आहे. आपल्या देशांतर्गत प्रश्नावर इतर कोणी बोलू नये असं म्हंटल्यावर सरकार भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांची चौकशी करणार याचं उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल पाहिजे, असाही टोला त्यांनी लगावला.

हेही वाचा -एमएसपी होता, आहे आणि राहणार, राज्यसभेत मोदींची ग्वाही

Last Updated : Feb 8, 2021, 8:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details