मुंबई- महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सर्व महिला लोकल डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची घोषणा करण्यात आली. या निर्णयाची पश्चिम रेल्वेकडून अंमलबजावणी ( CCTV cameras in Mumbai local ) करण्यात येणार आहे. सर्व लोकल ट्रेनमधील मोटार मॅनच्या कॅबिनमध्ये दोन सीसीटीव्ही कॅमेरे आणि रेल्वे मार्गावरील संशयित हालचालींचा तपास करण्यासाठी क्लोज सर्कीट टेलिव्हिजन (सीसीटीव्ही) कॅमेरे लावण्यात ( CCTV camera in motor man cabin ) येणार आहे.
मुंबईमधील लोकल रेल्वेमधील कॅमेरांसाठी पश्चिम रेल्वेला यंदाच्या अर्थसंकल्पात २ कोटी ३० लाख रुपयांची ( Budget for CCTV for local rail ) तरतूद करण्यात आली आहे. या सीसीटीव्ही कॅमेरामुळे रेल्वे मार्गावरील सुरक्षेत भर पडणार आहे. या उलट रेल्वे अपघात खोटे नुकसान भरपाईचे दावे करणाऱ्याही ( CCTV benefits in local railway ) आळा बसणार आहे. याबाबतचा ईटीव्ही भारतचा हा (ETV report on CCTV in local rail ) रिपोर्ट आहे.
मोटर मॅन कॅबिनबरोबर लोकलबाहेर आता सीसीटीव्ही कॅमेरे
मोटार मॅनच्या कॅबिनमध्ये दोन सीसीटीव्ही -
उपनगरीय लोकल रेल्वे म्हणजे जणू मुंबईची जीवनवाहिनी आहे. दररोज लाखों प्रवासी अनेक तास वेळ घालवून लोकल रेल्वेचा प्रवास करतात. लॉकडाऊन पूर्वी मुंबईचा रेल्वे मार्गावर दररोज ८ ते ९ नागरिकांचा मृत्यू होतो. वर्षभरात रेल्वे मार्गावरील मृत्यूचा आकडा ३ हजारच्या घरात आहे. यामध्ये ६० टक्के मृत्यू हे रेल्वे रुळ ओलांडताना होतात. ही रेल्वे प्रशासनासाठी डोके दुखी ठरत होती. कारण बहुतांश रेल्वे रूळ ओलांडताना अपघाती मृत्यू किंवा जखमी झालेल्या कुटुंबीयांकडून रेल्वे क्लेम्स ट्रिब्युनकडे नुकसान भरपाईचे दावे केले जात होते. अनेकदा पुऱ्याव्या अभावी रेल्वे क्लेम्स ट्रिब्युनला नुकसान भरपाई सुद्धा द्यावी लागली आहे. यामुळे या प्रकरणाला आळा घालण्यासाठी पश्चिम रेल्वे मार्गावरील ११३ लोकल रेल्वेसमोर रेल्वे ट्रकचे शूटिंग करण्यासाठी हायटेक सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात येणार आहे. याशिवाय ११३ लोकल ट्रेनमधील मोटार मॅनच्या कॅबिनमध्ये दोन सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बसविण्यात येणार आहे. यामुळे मोटर मॅनच्या कॅबिन आता आणि लोकलच्या समोर संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे.
हेही वाचा-Union Budget 2022 : आम्ही भाजपसारखा निवडणुकांवर लक्ष ठेवून अर्थसंकल्प सादर करत नाही - किशोरी पेडणेकर
११३ लोकल रेल्वेसमोर बसणार सीसीटीव्ही -
यंदाच्या अर्थसंकल्पात पश्चिम रेल्वेसाठी २५ टक्के निधीची वाढ झाली आहे. या निधीद्वारे प्रवासी सुरक्षा, रेल्वे विद्युतीकरण आणि पायाभूत सुविधा देण्यात येणार आहे. राज्यातील रेल्वे प्रकल्पांसाठी ११ हजार ९०३ कोटी रुपये निधी मिळाला आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या अर्थसंकल्पात पश्चिम रेल्वेच्या ११३ लोकल ट्रेन समोर आणि २२६ मोटार मॅनच्या कॅबिनमध्ये सीसीटीव्ही कमर बसविण्यासाठी २ कोटी ३० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या सीसीटीव्ही कॅमेरामुळे रेल्वे मार्गावरील आणि स्थानकांवरील देखरेख, गुन्ह्यांना प्रतिबंध करणे, खटल्यांची नोंदणी करणे, रेल्वे परिसरात तसेच धावत्या गाड्यांमध्ये त्यांचा तपास, कायदा व सुव्यवस्था राखणे आणि संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे शक्य होणार अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली आहे.
हेही वाचा-Mumbai Corporation Budget 2022 : अर्थसंकल्पात सात हजार कोटी आरोग्यसेवा बळकटीकरणासाठी
...असा होणार फायदा
मोटर मॅनच्या कॅबिनचा आत आणि लोकल समोर लावलेल्या कॅमेरामुळे विविध हालचालीवर लक्ष असणार आहे. याचा पहिला फायदा असा आहे की, धावत्या लोकलमधून रेल्वे रुळावर आणि रेल्वे रुळा शेजारी हालचालीवर नजर राहणार आहे. पावसाळ्यात रेल्वे रुळावर पाणी भरल्यानंतर मोटर मॅनकडून लोकल चालविण्यासंबंधित योग्य घेता येणार आहे. रेल्वे सिग्नल पाहण्यासाठी किंवा लोकलचा वेग मर्यादेवर लक्ष ठेवण्यासाठीही हा कॅमेरा प्रभावी ठरेल. आंदोलन किंवा लोकल रुळांवरून जाण्यासारख्या प्रकरणावरही कॅमेराद्वारे लक्ष ठेवता येणार आहे.
हेही वाचा-Union Budget 2022 : केंद्राकडून बुलेट ट्रेनचा लाड, अर्थसंकल्पात मुंबई-अहमदाबादसाठी 5 हजार कोटींची तरतूद
ही समस्या सुटणार -
मुंबईतील रेल्वे स्थानकावर गर्दीमुळे प्रवासी रेल्वे रुळांवर पडण्याच्या अनेक घटना घडतात. यावेळी समोरासमोरून लोकल रेल्वे ओलांडली तर ती घटना कॅमेऱ्यात कैद होऊ शकते. लोकल रेल्वेवर दगडफेकीच्या घटना अनेकदा घडतात. या प्रकरणांमध्येही आरोपींवर नजर ठेवली जाऊ शकते. लोकल रेल्वेच्या द्वारावर उभ्या असलेल्या प्रवाशांचे मोबाईल काठीने मारून चालत्या ट्रेनमधून खाली पडणाऱ्या फटका गॅंगला आळा घालताना येणार असल्याची माहितीही सुमित ठाकूर यांनी दिली आहे.