मुंबई -उपनगरीय रेल्वे मार्गावर महिला प्रवाशांची संंख्या ( Female Passengers on The Railway Line ) ज्या पटीने वाढत आहे. तेवढाच महिलांचा लोकल प्रवास देखील असुरक्षित होत आहे. इतकेच नव्हे तर आता लोकल ट्रेनचा प्रवासात महिलांवर अत्याचार होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्यामुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना म्हणून लोकल ट्रेनच्या महिला डब्यांत सीसीटीव्ही कॅमेरे ( CCTV Cameras in Women Compartments of Local Trains ) आणि टॉक बॅक यंत्रणा बसवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने गेल्या काही वर्षांपूर्वीच घेतला आहे. प्रत्येक्षात सीसीटीव्ही कॅमेरे महिलांचा डब्यात अजूनही लागले नाही. मात्र आता सर्व महिला डब्यांत कॅमेरे बसविण्यासाठी रेल्वे ( Railway Department ) निविदा काढण्याचा तयारीत आहे.
जानेवारी २०२२ मध्ये निविदा प्रक्रिया सुरु
मुंबईतील लोकलने दररोज लाखो महिला प्रवास करतात. गर्दीची वेळ असो वा शुकशुकाटाची चोरी, चेन स्नॅचिंग, छेडछाड यासारख्या गुन्ह्यांनी महिला त्रस्त आहे. यासाठी महिला लोकल डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे, टॉक बॅक प्रणाली असे विविध प्रयोग करण्याचे मध्य रेल्वेने ठरवले होते. काही डब्यात रेल्वेकडून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. मात्र, प्रत्येक्षात पुढे सर्व महिला डब्यात कॅमेरे बसविण्यात आले नाही. फक्त आतापर्यंत कागदोपत्री उपाययोजना केली जातात. परिणामी, लोकलच्या महिला डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची प्रक्रिया अनेक कालावधीपासून सुरू आहे. ही कामे कोरोना काळात बंद झाली होती. तर, आता नवीन वर्षात पुन्हा ही कामे रेल्वे हाती घेतली जाणार आहेत. रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त जितेंद्र श्रीवास्तव यांनी सांगितले की, मध्य रेल्वेवरील सर्व महिला डब्यात कॅमेरे लावण्यात येणार आहेत. यासाठी जानेवारी २०२२ मध्ये निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे. यात सुमारे ५३९ कॅमेरे बसविण्यात येण्याचा प्रस्ताव आहे. तर, सद्यस्थितीत १८० कॅमेरे महिला डब्यात लावले जाणार आहेत.
'या' घटनेनंतर रेल्वेला आली जाग