महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Industrialist Avinash Bhosle : डीएचएफएल आणि येस बँक प्रकरणी उद्योगपती अविनाश भोसले यांच्या विरोधात सीबीआयकडून आरोपपत्र दाखल - रिअल इस्टेट किंग पुणे

येस बँक आणि डीएचएफएल ( DHFL and Yes Bank Case ) माध्यमातून गैरव्यवहार केल्याप्रकरणी सीबीआयने 26 मे रोजी अटक केली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. आता सीबीआयने मुंबई सत्र न्यायालयातील ( Mumbai Sessions Court ) विशेष सीबीआय न्यायालयात ( Special CBI Court of Mumbai ) अविनाश भोसले यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.

Industrialist Avinash Bhosale
उद्योगपती अविनाश भोसले

By

Published : Jul 26, 2022, 7:02 AM IST

Updated : Jul 26, 2022, 7:18 AM IST

मुंबई : डीएचएफएल आणि येस बँक प्रकरणातील ( DHFL and Yes Bank Case ) आरोपी उद्योगपती अविनाश भोसले ( Industrialist Avinash Bhosle ) यांच्या विरोधात आज आरोपपत्र दाखल ( CBI Files Chargesheet ) करण्यात आले. आज सीबीआयकडून मुंबई सत्र न्यायालयातील ( Mumbai Sessions Court ) विशेष सीबीआय न्यायालयात ( Special CBI Court of Mumbai ) उद्योगपती अविनाश भोसले यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले. अविनाश भोसले यांना 26 मे रोजी सीबीआयने पुण्यातून अटक केली होती. सध्या अविनाश भोसले न्यायालयीन कोठडीत आहेत.


सीबीआयकडून यापूर्वीच झाली होती अटक : येस बँक आणि डीएचएफएल माध्यमातून गैरव्यवहार केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना 26 मे रोजी अटक केली. येस बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राणा कपूर यांनी डीएचएफएल समूहाचे प्रवर्तक कपिल आणि धीरज वाधवानसोबत डीएचएफएलला आर्थिक साहाय्य केले आहे.


अवैध गुंतवणूक आणि चुकीच्या मार्गाने कर्ज मंजुरीचा आरोप : येस बँकेने एप्रिल ते जून 2018 या काळात डीएचएफएलमध्ये अल्पमुदतीच्या नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचरमध्ये 3983 कोटी गुंतवले ( Yes Bank invested Rs 3983 Crore) होते. तसेच, येस बँकेने डीएचएफएलची समूह कंपनी असलेल्या आरकेडब्ल्यू डेव्हलपर्सला वांद्रे येथील प्रकल्पासाठी 750 कोटींचे आणखी कर्ज मंजूर केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे.



कर्जाच्या नावाखाली कोट्यवधी रुपये मिळाले : कपिल वाधवानने डीएचएफएलच्या माध्यमातून राणा कपूर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना येस बँकेकडून कर्जाच्या नावाखाली 600 कोटी रुपये दिल्याचा आरोप आहे. तर भोसले यांना तीन प्रकल्पांसाठी 2018 मध्ये 68 कोटी रुपये मिळाले होते. त्यातील अ‍ॅव्हेन्यू 54 आणि वन महालक्ष्मी हे दोन प्रकल्प बांधकाम व्यावसायिक संजय छाब्रियांनी विकसित केले आहेत.

मुंबईतील वरळी झोपडपट्टी पुनर्विकासातसुद्धा सल्ला शुल्क प्राप्त : दुसरीकडे भोसलेंना वरळी येथील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातही सल्ला शुल्क रक्कम मिळाली होती. प्रकल्पाचा खर्च वास्तुविशारद आणि अभियांत्रिकी आराखडा करार वित्तीय मूल्यांकन व संरचना आदींबाबत भोसलेंच्या कंपन्यांकडून सल्ला देण्यात आल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या प्रकरणी सीबीआयने अविनाश भोसलेंना अटक केली आहे. त्यानंतर आता सीबीआयने या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले असून, त्यात अविनाश भोसले, सत्येन तंडनसह अन्यांचाही समावेश आहे.


नेमकं काय आहे प्रकरण :पुण्याचे बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना CBI कडून अटक करण्यात आली होती. DHFL प्रकरणात त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. यातूनच त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली. गेल्या वर्षी जून 2021 मध्ये अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयातील सदस्यांच्या नावावर असलेली तब्बल 40 कोटी 34 लाख रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली होती. विदेशी मुद्रा प्रबंधन अधिनियमांतर्गत ही कारवाई करण्यात आली होती.

रिअल इस्टेट किंग म्हणून पुण्यात ओळख : DHFL घोटाळा प्रकरणानंतर त्यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. अविनाश भोसले आज कोट्यवधी रुपयांच्या एबीआयएल ग्रुपचे मालक आहेत. रिअल इस्टेट किंग अशी त्यांची पुण्यामध्ये ओळख आहे. अविनाथ भोसले यांच्या ओळखीतील लोक सांगतात की, 80 च्या दशकात ते रिक्षा चालवत असत. बांधकाम व्यवसायात आल्यानंतर सुरुवातीला कंत्राटदार ते आता पुण्यातील रिअल इस्टेट किंग, अशी त्यांची ओळख आहे.






हेही वाचा :प्रत्येक वर्षी २६ जुलै'ची आठवण! मुंबईत तब्बल १४९३ नागरिकांचा झाला होता मृत्यू; वाचा सविस्तर

Last Updated : Jul 26, 2022, 7:18 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details