मुंबई - सुशांतच्या स्वयंपाकी नीरज यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सुशांतच्या वांद्रेस्थित घरी सीबीआयचे पथक जाऊन घडलेल्या घटनेचे पुन्हा रिक्रिएशन करणार आहे. यासाठी नीरजकडून मिळालेल्या माहितीवरून हे रिक्रिएशन केले जाणार आहे.
सुशांतच्या घरी सीबीआय पथकाचे 'रिक्रिएशन', स्वयंपाकीच्या चौकशीने सुरुवात - CBI investigation on sushant singh rajput
सुशांतसिंह राजपूत प्रकरणी सीबीआयकडून तपास होत असताना या प्रकरणी सर्वात आधी सुशांतसिंहचा स्वयंपाकी नीरज याची सीबीआयने चौकशी केली आहे. या चौकशीदरम्यान नीरजला सीबीआयकडून काही प्रश्न विचारण्यात आले होते.

सुशांतसिंह राजपूत प्रकरणी सीबीआयकडून तपास होत असताना या प्रकरणी सर्वात आधी सुशांतसिंहचा स्वयंपाकी नीरजची सीबीआयने चौकशी केली. या चौकशीदरम्यान नीरजला सीबीआयकडून काही प्रश्न विचारण्यात आले होते. 14 जून रोजी सुशांतने आत्महत्या केली, त्यावेळी घरात कोण उपस्थित होते, असा प्रश्न सीबीआयने विचारला आहे. आत्महत्या 14 जून रोजी केली होती. मात्र त्याच्या अगोदर 13 जूनला सुशांतची मानसिक अवस्थेबद्दलही प्रश्न विचारण्यात आले आहेत. 14 जून रोजी आत्महत्या करण्याअगोदर सुशांतसिंहसोबत नीरजने कोणत्या गोष्टींबद्दल चर्चा केली होती, तसेच नीरजकडे खाण्यासाठी त्याने काय मागितले, याबाबत विचारणा झाल्याचे समोर आले आहे.
नीरज हा स्वयंपाकी होता. सुशांतने आत्महत्या केल्यानंतर त्या ठिकाणी सर्वात अगोदर सुशांतचा मृतदेह पाहणारा नीरजच होता. सुशांतने आत्महत्या केल्याचे लक्षात आल्यानंतर घरामध्ये कोण कोण उपस्थित होते? याबद्दल सीबीआयने नीरजला विचारणा केली आहे. सुशांतचा मृतदेह खाली कोणी उतरवला; आणि तसे करण्यास कोणी सांगितले, याबाबतबही सीबीआयने विचारणा केली आहे. यानंतर पोलिसांना फोन करण्यास कोणी सांगितले, फोन कोणी केला, अशा काही प्रश्नांची विचारणा नीरजला झाल्याचे समजते.