मुंबई :माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. येत्या 14 एप्रिल रोजी चौकशीचे समन्स सीबीआयने बजावले आहे. परमबीर सिंग यांनी लावलेल्या कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी हे समन्स बजावण्यात आले आहे.
अनिल देशमुखांना सीबीआयचे समन्स, गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी व्हावे लागेल हजर - 100 कोटींची वसुली
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयने चौकशीसाठी समन्स बजावले आहे.
तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीसाठी पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचा आरोप केल्यानंतर यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये परमबीर सिंग यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी होऊन सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांना मुंबई उच्च न्यायालयामध्ये यासंदर्भात दाद मागण्यासाठी सूचना केली होती. त्यानुसार परमबीर सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देत मुंबई उच्च न्यायालयाने यासंदर्भात सीबीआयला प्राथमिक चौकशीचे आदेश देत या संदर्भातील अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार सीबीआयकडून आता या प्रकरणाचा तपास केला जात आहे.