महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Anil Deshmukh Hearing :अनिल देशमुख यांना आणखी तीन दिवस कोठडी द्या; CBI ची न्यायालयात मागणी - Anil Deshmukh 100 crore extortion case

100 कोटी खंडणी प्रकरणी (100 Crore Extortion Case) माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) सध्या कोठडीत आहेत. अनिल देशमुख यांची आणखी तीन दिवसांची कोठडी वाढवून देण्याची मागणी सीबीआयने (CBI) विशेष सीबीआय न्यायालयात केली आहे.

Anil Deshmukh
अनिल देशमुख

By

Published : Apr 16, 2022, 4:43 PM IST

मुंबई - 100 कोटी खंडणी प्रकरणी (100 Crore Extortion Case) माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) सध्या कोठडीत आहेत. अनिल देशमुख यांची आणखी तीन दिवसांची कोठडी वाढवून देण्याची मागणी सीबीआयने (CBI) विशेष सीबीआय न्यायालयात केली आहे. तसेच निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे, कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांनादेखील न्यायालयीन कोठडीची मागणी सीबीआयने न्यायालयात केली आहे. देशमुख यांची कोठडी आज संपत असून, याबाबत विशेष सीबीआय न्यायालयात आज (16 एप्रिल) युक्तिवाद झाला.

हेही वाचा -Anil Deshmukh Case : अनिल देशमुख प्रकरणी 8 दिवसात उत्तर सादर करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे ईडीला निर्देश

कोठडी वाढवून देण्याची मागणी - 100 कोटी वसुली प्रकरणाचा तपास सध्या सीबीआय करत आहे. या प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख, सचिन वाझे, कुंदन शिंदे, संजीव पालांडे या चारही आरोपींना सीबीआयने ताब्यात घेतले होते. यानंतर न्यायालयात हजर केले असता विशेष सीबीआय न्यायालयाने त्यांना 16 एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली होती. आज सीबीआय कोठडी संपल्यानंतर पुन्हा चारही आरोपीना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. अनिल देशमुख यांना पुन्हा तीन दिवसांची कोठडी वाढवून देण्याची मागणी सीबीआयच्या वकिलांकडून न्यायालयात करण्यात आली. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय न्यायालयात सुनावणी झाली.

काय आहे प्रकरण? - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या लेटर बॉम्बमुळे अनिल देशमुख अडचणीत आले आहेत. देशमुखांची मनी लाँड्रिंग प्रकरणी चौकशी सुरू आहे. 21 एप्रिल रोजी देशमुखांविरोधात गुन्हा नोंदवून 12 तासांच्या चौकशीनंतर 1 नोव्हेंबर रोजी ईडीने देशमुखांना अटक केली होती. तेव्हापासून देशमुख आर्थर रोड कारागृहात आहेत. 29 डिसेंबर 2021 रोजी ईडीने देशमुखांसह अन्य आरोपींविरोधात आरोपपत्र पीएमएलए अंतर्गत विशेष न्यायालयात दाखल केले आहे. मुंबई सत्र न्यायालयाने अनिल देशमुखांचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर देशमुखांनी सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांना झालेल्या आजाराची पूर्ण माहिती शपथपत्राच्या स्वरूपात मागितली आहे.

हेही वाचा -Anil Deshmukh Health Issue : ऑर्थर रोड जेलमध्ये अनिल देशमुखांवर नवाब मलिकांनी केले प्राथमिक उपचार!

ABOUT THE AUTHOR

...view details