मुंबई : इंटरपोलच्या इनपुटनंतर सीबीआयची भारतभर मोठ्या प्रमाणावर छापेमारी ( CBI Raids In India ) सुरू झाली आहे. चाइल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी ( child pornography ) ही छापेमारी मुंबई दिल्ली, बंगळुरू,पाटणासह 20 राज्यांमध्ये ही छापेमारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. इंटरपोलच्या इनपुटनंतर सीबीआयची 20 राज्यांत 56 ठिकाणी छापेमारी सुरु आहे. ऑनलाईन बाल लैंगिक शोषण ( Online child sexual abuse ) म्हणजेच चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी ही करवाई ( CBI action in child pornography case ) सुरु आहे. या कारवाईला 'ऑपरेशन मेघचक्र' असे नाव देण्यात आले आहे. सिंगापूर न्यूझीलंड, इंटरपोल युनिटने दिलेल्या माहिती आधारे सीबीआय छापे टाकत आहे.
चाइल्ड पोर्नोग्राफी चिंतेचा विषय - सीबीआयच्या म्हणण्यानुसार, अशा बर्याच टोळ्यां आहेत ज्या बाल लैंगिक शोषणाशी संबंधित सामग्रीचा वापर करतात. तसेच, मुलांना शारीरिकदृष्ट्या ब्लॅकमेल करून त्रास देतात. या टोळ्या सामुहिक तसेच वैयक्तिकरित्या बाल लैंगिक शोषणाशी संबंधित काम करतात. गेल्या वर्षी सीबीआयने ऑपरेशन कार्बन नावाचे ऑपरेशन करून संबधितांवर कारवाई केली होती. चाइल्ड पोर्नोग्राफी ही देशात सध्या चिंतेचा विषय बनला आहे. भारतातील सोशल मीडिया साइट्सवर अपलोड होत असलेल्या चाइल्ड पोर्नोग्राफीचे व्हिडिओ, मजकूर यावर सर्वोच्च न्यायालयाने देखील चिंता व्यक्त केली आहे.