मुंबई:माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या जामीन अर्जावर (Anil Deshmukh bail) सीबीआयचे उत्तर दिले आहे. देशमुख यांच्या जामीन अर्जाला सीबीआयचा विरोध आहे. अर्जावर सविस्तर सुनावणी 18 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
देशमुख जसलोक रुग्णालयात दाखल - राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना आर्थर रोड तुरुंगातून जसलोक रुग्णालयात नेण्यात आले. विशेष पीएमएलए न्यायालयाने अनिल देशमुख यांची खासगी रुग्णालयात अँजिओग्राफी करण्याची परवानगी दिल्यानंतर त्यांना आज जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले.
100 कोटी वसुली प्रकरणात सीबीआयकडून देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात जामीन मिळावा यासाठी अनिल देशमुख यांनी अर्ज दाखल केला होता. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाने ईडीला 14 ऑक्टोंबर पर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्णय दिले होते.
CBI ने अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जाला केलेल्या विरोधातील प्रमुख मुद्दे:
- अनिल देशमुख हे प्रभावशाली व्यक्ति आहेत. ते राज्याचे गृहमंत्री होते.
- ते 5 ऑक्टोबर, 7 ऑक्टोबर, 9 ऑक्टोबर आणि 15 ऑक्टोबर या चार तारखांना तपासकामी हजर राहिले नाहीत.
- चांदीवाल आयोग नियुक्ती ही 1952 च्या कायद्यानुसार नाही त्यामुळे चांदीवाल आयोग हा नियमबाह्य आहे.
- सचिन वाझे याचे 164 अन्वये नोंदवलेले सर्व जबाब रिलायबल. या जबाबात अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप आहेत.
- एसीपी संजय पाटील यांच्या CRPC161 अंतर्गत जबाबात अनिल देशमुख यांनी नियमबाह्य कलेक्शन करण्याचे आदेश दिले होते.
- एसीपी संजय पाटील आणि अनिल देशमुख ह्या दोघांत व्हॉट्सअप्प वर झालेलं याबाबतचं संभाषण एसीपी पाटील यांनी मान्य केलंय.
काय आहेत आरोप ? : अनिल देशमुख यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचा आणि बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ईडीच्या आरोपांनुसार, पोलीस अधिकारी सचिन वाझेने मुंबईतील ऑर्केस्ट्रा बारमालकांकडून 4.7 कोटी रुपये उकळले आणि ही रक्कम अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे यांना दिली होती, जे नंतर नागपूरला गेले आणि त्यांनी एका व्यक्तीला हे पैसे सोपवले. हवालाद्वारे हे पैसे दिल्लीस्थित सुरेंद्र कुमार जैन आणि वीरेंद्र जैन यांना पाठवले गेले होते. ते दोघेही बनावट कंपन्या चालवत होते. जैन यांनी हे पैसे नागपूरच्या श्री साई एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या देशमुख कुटुंबाच्या नियंत्रणाखाली असलेल्या ट्रस्टला दान केल्याचा आरोप ईडीने केला आहे.
मनी लाँड्रिंग केस:देशमुख यांना ईडीने 2 नोव्हेंबर 2021 रोजी मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली होती. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांनी त्यांच्यावर ऑर्केस्ट्रा बार मालकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केल्यानंतर त्या वर्षी 21 एप्रिल रोजी सीबीआयने नोंदवलेल्या एफआयआरवर ईडीचा खटला आधारित आहे. 20 मार्च 2021 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतरांना लिहिलेल्या पत्रात सिंह यांनी आरोप केला होता की - देशमुख यांनी वाझे यांच्यासह काही पोलिस अधिकाऱ्यांना दरमहा बारमधून 100 कोटी गोळा करण्याची आदेश दिले होते. अँटिलिया स्फोटकांचा धाक आणि त्यानंतर ठाणे येथील कार अॅक्सेसरीजचे दुकान मालक मनसुख हिरण यांच्या हत्येतील प्रमुख आरोपी म्हणून राष्ट्रीय तपास संस्थेने वाझेला अटक केली (Anil Deshmukh case) आहे.
कधी झाली होती अटक? :अनिल देशमुख यांना 1 नोव्हेंबर 2021 रोजी 'ईडी'ने अटक केली होती. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी देशमुखांवर शंभर कोटी रुपये वसुलीचा गंभीर आरोप केला होता. 'ईडी'ने याप्रकरणी देशमुख यांना अटक केली होती. (Why was Anil Deshmukh Arrested) ईडीने याप्रकरणी देशमुख यांना पाच वेळा समन्स पाठवले होते, पण ते एकदाही हजर झाले नव्हते. ते नॉटरिचेबल झाले होते. अखेर 1 नोव्हेंबर रोजी सकाळी ते स्वतःहून 'ईडी'समोर झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे वकील इंद्रपाल सिंहसुद्धा होते. अधिकाऱ्यांनी तब्बल 10 तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली होती.