मुंबई :माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thakrey) यांच्या जवळचे असणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या अडचणीत वाढ होतांना दिसत आहे. संजय पांडे यांच्या विरोधात सीबीआय (CBI issues look-out Notice) कडून लूक आऊट नोटीस काढण्यात असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांकडून मिळाली आहे. पांडे 30 जून रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर केंद्रीय यंत्रणा संजय पांडे यांच्या विरोधात, सक्रिय झाल्याचे चित्र आहे. पांडे यांना दिल्ली येथील कार्यालयात चौकशीला बोलवण्यात आले. पोलीस आयुक्त पदावर कार्यरत असताना भाजपच्या अनेक नेत्यांविरोधात पांडे यांनी तक्रारी दाखल केल्या असा त्यांच्यावर आरोप आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे आता ईडीनंतर सीबीआयच्या रडारवर आले आहेत. निवृत्त होताच तीन दिवसांनी त्यांना ईडीने नोटीस पाठवली होती. त्यानुसार आज 5 जुलै रोजी त्यांना चौकशीसाठी बोलवले आहे. दरम्यान दोनच दिवसांपूर्वी त्यांना सीबीआयनेही लूक आऊट नोटीस जारी केली होती ,अशी माहिती समोर येत आहे.माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचे असणारे संजय पांडे यांनी त्यांच्या कार्यकाळात त्यांनी भाजप नेत्यांना त्रास दिल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. तसेच भाजप नेत्यांना ते सर्वाधिक टार्गेट करत असत. त्यामुळे सेवानिवृत्त होताच संजय पांडे यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर आता सीबीआयने लूक आऊट नोटीस पाठवल्याचेही वृत्त समोर आले आहे.