महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सुशांतसिंह मृत्यू प्रकरण: रिया चक्रवर्तीची सलग तिसऱ्या दिवशी मागील तीन तासांपासून चौकशी सुरू - सुशांतसिंह राजपूत प्रकरणी सीबीआय चौकशी

सुशांतसिंहची मैत्रिण रिया चक्रवर्तीची आज तिसऱ्या दिवशीही सीबीआय चौकशी करण्यात येत आहे. मागील ३ तासांहून अधिकवेळापासून ही चौकशी सुरू आहे.

रिया चक्रवर्ती
रिया चक्रवर्ती

By

Published : Aug 30, 2020, 2:18 PM IST

Updated : Aug 30, 2020, 2:54 PM IST

मुंबई - सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरू आहे. शुक्रवार आणि शनिवारी अभिनेत्री रिया चक्रवर्तीची सुमारे १७ तास चौकशी करण्यात आली. आज रविवारी रिया चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, सिद्धार्थ पिठाणी हे तिघेही सीबीआयसमोर हजर झाले असून गेल्या तीन तासाहून अधिक काळ त्यांची चौकशी केली जात आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह याचा 14 जूनला मृत्यू झाला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एडीआर रिपोर्ट दाखल केला होता. मात्र, याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केला नव्हता. याच दरम्यान सुशांतसिंहच्या वडिलांनी बिहारमध्ये एफआयआर दाखल केला. प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी जोर धरू लागली असताना सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिला आहे.

सुशांतसिंह प्रकरणी सीबीआय गेले दहा दिवस मुंबईत चौकशी करत आहे. सुशांतसिंह याची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिची गेले दोन दिवस 17 तास चौकशी करण्यात आली आहे. आज तिसऱ्या दिवशी पुन्हा रिया सांताक्रूझ येथील डीआरडीओच्या अतिथी गृहात चौकशीसाठी 10.32 वाजता हजर झाली. तिच्या आधी सॅम्युअल मिरांडा चौकशीसाठी हजर झाला आहे. तसेच सुशांतच्या सोबत घरात राहणार त्याचा मित्र सिद्धार्थ पिठानी हा सुद्धा सीबीआय अधिकाऱ्यांपुढे चौकशीसाठी हजर झाला आहे. गेल्या तीन तासाहून अधिक काळ रिया चक्रवर्तीची चौकशी सीबीआय अधिकारी करत आहेत. याप्रकरणी नीरजसिंह यांची सीबीआयने चौकशी केली आहे. या प्रकरणात अमली पदार्थाची माहिती समोर आल्याने एक नवीन वळण मिळाले आहे. दरम्यान, रियाने मीडिया आपल्याला त्रास देत असल्याची तक्रार केल्यावर तिला सीबीआय चौकशीसाठी जाण्यास आणि पुन्हा घरी येताना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.

हेही वाचा -सुशांतसिंह राजपूत प्रकरणी 'ईडी' करणार गौरव आर्याची चौकशी

Last Updated : Aug 30, 2020, 2:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details