महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Avinash Bhosale : अविनाश भोसलेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी - उद्योगपती अविनाश भोसलेंना न्यायालयीन कोठडी

सीबीआय कोर्टाने अविनाश भोसलेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सीबीआयने कोठडी वाढवून देण्याची मागणी केली होती. मात्र, सीबीआय कोर्टाने ती फेटाळली ( avinash bhosale 14 day judicial custody ) आहे.

Avinash Bhosale
Avinash Bhosale

By

Published : Jun 8, 2022, 10:09 PM IST

मुंबई - डीएचएफएल आणि येस बँक घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या उद्योगपती अविनाश भोसले यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. भोसले यांना 26 मे रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना 10 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आलेली. आज ( 8 मे ) त्यांना बुधवारी पुन्हा न्यायालयात हजर केले असता भोसलेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे भोसले यांच्या अडचणीत वाढ झाली ( avinash bhosale 14 day judicial custody ) आहे.

न्यायालयाच्या वरील आदेशानंतर भोसले यांची रवानगी आर्थर रोड कारागृहात रवानगी करण्यात येणार आहे. आजच्या सुनावणीवेळी सीबीआयने भोसले यांची सीबीआय कोठडी वाढवून देण्याची मागणी केली होती. परंतु, विशेष सीबीआय न्यायालयाने ती मान्य करण्यास नकार दिला.

दरम्यान, मुंबईच्या आर्थर रोडमध्ये नव्या कैद्यांसाठी जागा नसल्याने अविनाश भोसलेंना नवी मुंबईत तळोजा कारागृहात हलवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भोसले यांच्या घरावर एप्रिल महिन्यातच सीबीआयने छापे टाकले होते. तर, मागील वर्षी सीबीआयने त्यांची तब्बल 40.34 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. मागील काही वर्षांपासून येस बँक व डीएचएफएल प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरु आहे. त्यांनी यापूर्वी उद्योजक संजय छाब्रिया यांना अटक केली आहे. तसेच विनोद गोएंका व शाहीद बलवा यांच्यावरही कारवाई केली आहे.

काय आहे प्रकरण? - सीबीआयने डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी अविनाश भोसले यांच्यावर ही कारवाई केली. अविनाश भोसले यांचे नाव येस बँक घोटाळाप्रकरणीही चर्चेत होते. या दोन्ही प्रकरणाची सीबीआयने चौकशी सुरू केली होती. शिवाय याप्रकरणी पुणे मुंबई परिसरातील तब्बल 8 ठिकाणी छापेमारी केली होती. या छाप्यातून सीबीआयच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे लागल्याचे समजते. त्यातूनच ही कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा -Sidhu Moose Wala Murder : सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात मोठी कारवाई; फरार सौरभ महाकालला अटक

ABOUT THE AUTHOR

...view details