मुंबई -शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी ची मुलगी विधी पीटर मुखर्जी हिने मुंबई सत्र न्यायालयातील ( Bombay Sessions Court ) विशेष सीबीआय कोर्टामध्ये तिची आई इंद्राणी मुखर्जी सोबत राहण्यासाठी परवानगी मागण्याचा अर्ज दाखल केला होता हा अर्ज आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाने ( CBI Court ) फेटाळून लावला आहे. विधी 10 सप्टेंबरला भारतात परत येणार असल्याने केला अर्ज होता.
इंद्राणी मुखर्जीला शीना बोराच्या हत्याकांडात अटक -मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाने अर्ज फेटाळताना असे निरीक्षण नोंदवले की या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर इंद्राणीला काही अटी आणि शर्तीच्या आजारावर जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यामधील अटीच्या मध्ये या प्रकरणातील कुठल्याही साक्षीदाराला साक्ष नोंदवण्यापर्यंत भेटता येणार नाही. तसेच त्यांच्याशी कुठलाही संपर्क अथवा संवाद साधता येणार नाही. अशी अट घालून देण्यात आले होती अद्याप विधीची साक्षर नोंदणी बाकी असल्याने तिला तिच्या आईसोबत राहता येणार नाही असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने विधीचा अर्ज फेटाळून लावला आहे.आरोपी इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जी यांची मुलगी विधी मुखर्जी हे गेल्या अनेक वर्षांपासून लंडनमध्ये राहात आहे. इंद्राणी मुखर्जीला शीना बोराच्या हत्याकांडात अटक ( Indrani Mukherjee arrested in Sheena Bora's murder case ) करण्यात आल्यानंतर इंद्राणी मुखर्जी आणि विधी हे दोघेही अलग अलग राहत होत्या. तेव्हापासूनच विधी लंडनमध्ये वास्तव्यास असल्याने ती आता पुन्हा भारतात 10 सप्टेंबर रोजी परत येणार असल्याने तिने आई इंद्राणी मुखर्जी सोबत राहण्याची परवानगी सीबीआय कोर्टामध्ये मागितली होती.
गेल्या सात वर्षांपासून ती आई पासून दूर -वकील रणजीत सांगळे यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या याचिकेत विधी म्हणाली की 2015 मध्ये जेव्हा तिच्या आईला अटक करण्यात आली तेव्हा ती अल्पवयीन होती. अटक झाल्याच्या दिवसापासून ती तिच्या आईच्या सहवास, प्रेम आणि उबदारपणापासून वंचित आहे. गेल्या सात वर्षांपासून ती तिच्या आई पासून दूर राहत आहे. याचा अर्जदाराच्या भावनिक आरोग्यावर गंभीर परिणाम झाला आहे असे त्यात म्हटले आहे. विधीला आता वेगळेपणाचा सामना करणे अत्यंत कठीण जात आहे म्हणूनच तिला तिच्या आईसोबत मुक्तपणे संवाद साधता यावा आणि तिच्यासोबत राहता यावे इच्छा आहे. अर्जदाराशिवाय इंद्राणी मुखर्जीचे मुंबईत कुटुंब नाही असेही अर्जात म्हटलेले आहे. आपल्या आईसोबत राहण्यास सक्षम असणे एखाद्याच्या आजारी आईची काळजी घेणे हा कोणत्याही मुलाचा मूलभूत अधिकार आहे असेही याचिकेत म्हटलेले आहे.
काय आहे प्रकरण -इंद्राणी मुखर्जीने एकूण तीन लग्न केली आहेत. ज्यात प्रथम तिला पतीपासून मुलगी झाली. तिचं नाव शीना बोरा होतं. इंद्राणी मुखर्जीचा तिसरा नवरा पीटर मुखर्जी हा इंद्राणी मुखर्जीचा मुलगा आणि शीना बोराचे अफेअर असल्याचे सांगितलं जातं. इंद्राणी आणि पीटर मुखर्जी दोघेही यामुळे अस्वस्थ होते. एप्रिल 2012 मध्ये नवी मुंबईजवळील जंगलात 24 वर्षीय शीनाची कारमध्ये गळा आवळून हत्या करण्यात आली होती आणि शेजारच्या रायगड जिल्ह्यात मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली होती. 2015 मध्ये ही हत्या उघडकीस आल्यानंतर इंद्राणीशिवाय तिचा ड्रायव्हर श्यामवर राय आणि संजीव खन्ना यांनाही मुंबई पोलिसांनी अटक केली होती. इंद्राणीचा पती पीटर यालाही नंतर या प्रकरणात आरोपी बनवून अटक करण्यात आली होती. तपासानुसार शीनाच्या राहुलसोबतच्या संबंधांना इंद्राणीचा विरोध होता. याशिवाय आर्थिक वाद हा हत्येमागील संभाव्य कारण होतं. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. या प्रकरणी इंद्राणी मुखर्जी 2015 पासून मुंबईतील भायखळा कारागृहात बंद आहे.