महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

आगामी निवडणुकांसाठी वेळीच मिळणार जातवैधता प्रमाणपत्र : राज्य निवडणूक आयुक्त - State Election Commissioner

येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. आतापासूनच जात प्रमाणपत्रासह जातवैधता प्रमाणपत्रासाठी वैयक्तिक स्तरावर पूर्तता करावी, असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केले आहे.

State Election Commissioner
राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान

By

Published : Sep 23, 2021, 7:52 PM IST

मुंबई -आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्याने उमेदवारांची जात प्रमाणपत्रासाठी धावपळ उडते. हे प्रमाणपत्र वेळेत उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. आतापासूनच जात प्रमाणपत्रासह जातवैधता प्रमाणपत्रासाठी वैयक्तिक स्तरावर पूर्तता करावी, असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केले आहे.

हेही वाचा -अबब..! ज्योतिरादित्य सिंधिया यांनी स्वत:चा मास्क माजी मंत्र्याला घातला, पाहा व्हिडिओ..

  • आतापासूनच संबंधितांनी जातवैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी तयारी करावी -

राज्यभरातील महानगरपालिका, नगरपरिषदा/ नगरपंचायती, जिल्हा परिषदा, पंचायत समिती व ग्रामपंचायती या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी काळात निवडणुका होणार आहेत. संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वेगवेगळ्या कायद्यानुसार राखीव जागांवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशन पत्रासोबत जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते. त्यासाठी इच्छूक उमेदवारांनी प्रथमत: जात प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे. त्यानंतर जातवैधता प्रमाणपत्रासाठी आवश्यक त्या कागदपत्रांच्या पूर्ततेसह जात पडताळणी समितीकडे अर्ज करावा. त्यादृष्टीने आतापासूनच संबंधितांनी तयारी करणे आवश्यक आहे. जेणेकरून नामनिर्देशनपत्र सादर करताना ऐनवेळी कोणाचीही धावपळ होणार नाही आणि एकही इच्छूक उमेदवार जातवैधता प्रमाणपत्राअभावी निवडणूक लढवण्यापासून वंचित राहणार नाही, असे आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी सांगितले.

हेही वाचा -ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदील; सुधारित अध्यादेशावर राज्यपालांची सही

ABOUT THE AUTHOR

...view details