महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Clean cheat to Sameer Wankhede शाहरूख खानच्या मुलाला अटक करणारे समीर वानखेडे मुस्लीम नाही - Nawab Malik Allegations

एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे Clean cheat to Sameer Wankhede यांना जात पडताळणी समितीकडून मोठा दिलासा Sameer Wankhede caste certificate मिळाला आहे. जात पडताळणी समितीकडून समीर वानखेडे यांना Caste Certificate Scrutiny Committee क्लिनचीट मिळाल्याची माहिती Sameer Wankhede caste case सूत्रांनी दिली. वडिलांनी मुस्लीम धर्म स्वीकारला होता, हे सिद्ध होत नसल्याने क्लिनचीट मिळाली आहे.

Caste Certificate Scrutiny Committee Clean cheat to Sameer Wankhede
समीर वानखेडे जात पडताळणी पत्र वाद

By

Published : Aug 13, 2022, 11:37 AM IST

Updated : Aug 13, 2022, 12:26 PM IST

मुंबईएनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखडे Clean cheat to Sameer Wankhede यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारच्या जात पडताळणी समितीकडून सुरू असलेली चौकशीतून वानखडे Sameer Wankhede caste certificate यांना क्लिनचीट देण्यात आली आहे. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने वानखेडे हे अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्याचे अहवालात म्हटले आहे. तत्कालीन महाविकास आघाडी Sameer Wankhede caste case सरकारमधील माजी मंत्री नवाब मलिक Nawab Malik Allegations यांनी समीर वानखेडे यांनी बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळवली असल्याचा आरोप केला होता.

हेही वाचाArvind Sawant on New Shivsena bhawan काही लोक मुर्खांच्या नंदनवनात राहतात अशी नव्या शिवसेना भवनाच्या मुद्द्यावरून अरविंद सावंत यांची टीका

जात प्रमाणपत्र खोटे असल्याची तक्रार -जात पडताळणी समितीकडून समीर वानखडे यांच्या चौकशीनंतर अहवाल तयार करण्यात आला होता. हा अहवाल 96 पानांचा असून, यामध्ये समीर वानखडे यांना क्लिनचीट देण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते अशोक कांबळे यांनी माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचा जात प्रमाणपत्र खोटे असल्याची तक्रार केली होती व त्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानुसार अशोक कांबळे यांच्या वकिलांनी कागदपत्रे समितीला सादर केली. तक्रारदार अशोक कांबळे यांचे वकील नितीन सातपुते हे जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयात उपस्थित होते.

शाहरूख खानच्या मुलाला केली होती अटक - समीर वानखेडे हे एनसीबीचे अधिकारी असताना त्यांनी अभिनेता शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन खान याला अंमली पदार्थ प्रकरणी अटक केली होती. त्यानंतर समीर वानखेडे यांनी केलेली कारवाई बोगस असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला होता. मलिक यांनी वानखेडे यांच्याविरोधात आरोपांची जंत्रीच सादर करत त्यांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यातच मलिक यांनी वानखेडे यांनी बोगस जात प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळवली असल्याचा आरोप केला होता.

समीर वानखेडे हे जन्माने मुस्लीम नाही -समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्रावरील आक्षेपाची जात प्रमाणपत्र पडताळणी समितीसमोर सुनावणी झाली. या प्रकरणाची सुनावणी करताना समितीने काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवत वानखेडे यांनी क्लिनचीट दिली. समीर वानखेडे हे जन्माने मुस्लीम नसल्याचे या समितीने म्हटले. समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी हिंदू धर्माचा त्याग करून मुस्लीम धर्मामध्ये विधीवत धर्मांतर केले नसल्याचे समितीने म्हटले. समीर वानखेडे यांचे वाडवडील हे हिंदू धर्मीय अनुसूचित जातीतील असल्याचे सिद्ध होत असल्याचेही जातपडताळणी समितीने म्हटले. समीर वानखेडे यांच्याविरोधात करण्यात आलेल्या तक्रारीत तथ्य नसल्याने ही तक्रार फेटाळून लावण्यात येत असल्याचे जात पडताळणी समितीने म्हटले.

हेही वाचाSaamna Criticize on Shinde Government बिनचेहऱ्याचे आणि बिनखात्याचे नामुष्की सरकार सामनातून सरकारवर टीकास्त्र

Last Updated : Aug 13, 2022, 12:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details