महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Theft Beauty Parlour : ब्युटी पार्लरमध्ये मेकअपसाठी आली अन्... - Cash jewelery stolen

ब्युटी पार्लरमध्ये एका अनोखळी महिलेने महिलांच्या पर्समधून दागिन्यासह रोकड घेऊन पोबारा ( Theft of cash with jewellery ) केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात ( Mahatma Phule Police Station ) अज्ञात चोरट्या महिलेविरोधात गुन्हा दाखल ( Crime against female thief ) करून पोलिसांनी तिचा शोध सुरु केला आहे.

Theft
ब्युटी पार्लरमध्ये चोरी

By

Published : Oct 13, 2022, 8:14 PM IST

ठाणे :ब्युटी पार्लरमध्ये एका अनोखळी महिलेने महिलांच्या पर्समधून दागिन्यासह रोकड घेऊन पोबारा ( Theft of cash with jewellery ) केल्याची घटना घडली आहे. ही घटना कल्याण पश्चिम भागातील दोन ब्युटी पार्लरमध्ये घडली आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात ( Mahatma Phule Police Station ) अज्ञात चोरट्या महिलेविरोधात गुन्हा दाखल ( Crime against female thief ) करून पोलिसांनी तिचा शोध सुरु केला आहे.

कोकड संपास -कल्याण पश्चिम भागात रामबाग, कर्णिक रोड परिसरात योगिता सलून ऍण्ड ब्युटी पार्लर आहे. या पार्लरमध्ये १२ ऑक्टोंबर रोजी सायंकाळच्या सुमारास अज्ञात चोरटी महिला वॅक्स करण्याच्या बहाण्याने आली होती. त्यावेळी पार्लरमध्ये पूजा देठे नावाची महिला फेशियल करण्यात गुंग होती. चोरट्याने पूजा यांच्या पर्समधून हातचलाखीने ६४ हजार ५०० रुपयांचे दागिने तसेच साडेचार हजार रुपयांची रोकड ( Theft Beauty Parlour ) लंपास केली आहे.

दोन्ही पार्लरमधून ७१ हजार ३०० रुपयांचे लंपास -खळबळजनक बाब म्हणजे योगिता पार्लर मधून चोरी करण्याआगोदर चोरटी महिला कल्याण पश्चिम भागातील मोनिका ब्युटी पार्लरमध्ये मेकअपच्या बहाण्याने गेली होती. त्यावेळीही महिलेने रोकड लंपास केली होती. या दोन्ही पार्लरमधून ७१ हजार ३०० रुपयांचे दागिनेसह रोकड चोरल्याप्रकरणी पूजा देठे यांनी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा अनोखळी महिलेवर दाखल केला.

ही चोरटी महिला दोन्ही पार्लरमध्ये बाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तिचा शोध सुरु केला आहे. या गुन्हाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग साबळे करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details