मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या विरोधात मानहानीची ( Kirit Somaiya Defemation Case Sanjay Raut ) तक्रार दाखल केल्यानंतर आता शिवसेना नेते व खासदार संजय राऊत अधिकच आक्रमक झाले ( Sanjay Raut warned BJP ) आहेत. सध्या ते सोमय्या यांची भ्रष्टाचाराची विविध प्रकरणे बाहेर काढत ( Kirit Somaiya Fraud Cases ) असून, त्यांच्यावर रोज नवीन आरोप करत आहेत. याप्रकरणी आज देखील संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून, स्वतःला भ्रष्टाचाराचे विरोधाचे कैवारी म्हणवून घेणाऱ्या भाजपच्या या लोकांनी सुरुवात केली. आता यांचा शेवट आम्ही करणार. सोमय्या यांसारख्या भाजपच्या 28 प्रमुख नेत्यांची प्रकरण बाहेर ( BJPs 28 Leaders Cases Will Taken Out ) काढणार, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. ते मुंबईत आपल्या निवासस्थानी बोलत होते.
काय म्हणाले राऊत ? :"NSEL 5600 कोटी शेअर्स घोटाळा चौकशीची मागणी किरीट सोमय्याने केली होती. मोतीलाल ओसवाल कंपनीची या प्रकरणी ED ने चौकशी केली. स्वतः किरीट चौकशी साठी कंपनी शिपायांचे घरी गेले. तमाशा केला. 2018-19 असे 2 वर्ष सोमय्याने मोतीलाल ओसवाल कडून लाखो रुपये त्याच्या युवक प्रतिष्ठानसाठी घेतले. याची तक्रार मी राज्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे दाखल करणार आहे. इतकच नाही तर ही सर्व प्रकरण केंद्रीय तपास यंत्रणांकडे देखील देणार आहे. कारण यात त्यांचा थेट संबंध आहे." अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
भाजपच्या 28 नेत्यांची प्रकरणं बाहेर काढणार :पुढे बोलताना राऊत म्हणाले की, "मी फक्त सध्या लहान लहान प्रकरणे यांची बाहेर काढतोय. हे लोक स्वतः भ्रष्टाचारात एवढी गुंतलेली आहेत आणि महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्तीच्या वार्ता करत आहेत. मागे मी काही यांची प्रकरणे बाहेर काढली त्याचे खुलासे यांनी अजून केलेले नाहीत. युवक प्रतिष्ठान हा बॅक मनी व्हाईट करण्याचा एक उद्योग आहे. यांच्या स्वतःच्या तोंडाला शेणाचा वास आहे. यांची रोज एक प्रकरणं बाहेर येतील आता. सुरुवात यांनी केली शेवट आम्ही करू. प्रकरण फक्त एकट्या किरीट सोमय्याच नाहीये. भाजपच्या 28 प्रमुख नेत्यांची प्रकरण मी बाहेर काढणार."
याची उत्तर द्यावी लागतील :"केंद्रीय तपास यंत्रणा मुंबईतील बिल्डर, मुंबईतील व्यापारी यांच्यावर ज्या धाडी टाकतात त्यांच्याकडूनच भाजपच्या काही नेत्यांना आणि सोमयांच्या युवक प्रतिष्ठानला पैसे कसे काय जातात ? ज्यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया सुरू आहेत अशा लोकांना हे सोमय्या ब्लॅकमेल करतात. त्यांच्याकडून युवक प्रतिष्ठानच्या नावाने चेक घेतात. या सर्वांची आता चौकशी सुरू होईल. केंद्रीय तपास यंत्रणांना देखील याचे उत्तर द्यावे लागतील." असा थेट आरोपच संजय राऊत यांनी केला आहे. दरम्यान, संजय राऊत यांच्या आरोपांवर आता भाजप व किरीट सोमय्या नेमकी काय प्रतिक्रिया देतात व त्यांची पुढची रणनीती काय ठरते हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा : Sanjay Raut : संजय राऊतांचे किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप, ट्विट करत म्हणाले, ५ हजार ६०० कोटींच्या..