मुंबई - कोरोणा संक्रमणावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता व त्यानंतर मुंबई शहरात हळूहळू अनलॉकच्या दिशेने पावले टाकली जात आहेत. मात्र मुंबई पोलिसांकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांच्या विरोधात कारवाई अजूनही सुरू आहे .
मुंबईतील वेगवेगळ्या परिसरात अशी झाली कारवाई
२० मार्च २०२० ते २१ फेब्रुवारी २०२१ पर्यंत करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान आतापर्यंत मुंबई शहरात २७७१५ जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये दक्षिण मुंबईतून सर्वाधिक ६५०२ जणांवर कारवाई करण्यात आलेली असून , मध्य मुंबई २८९१ जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. पूर्व मुंबई ३७५२, पश्चिम मुंबईत ३८६२ , तर उत्तर मुंबईत सर्वाधिक १०७०८ जणांवर १८८ कलम नुसार नियमांचे उल्लंघन करण्यासंदर्भात कारवाई करण्यात आलेली आहे.