महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Pravin Darekar : विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकरांवर गुन्हा दाखल झाल्याचे विधानपरिषदेत पडसाद.. कामकाज तहकूब

मुंबै बँकेत मजूर असल्याचे दाखवत निवडून आल्याप्रकरणी विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला ( Complaint Lodged Agaist Pravin Darekar ) आहे. याचे पडसाद विधानपरिषदेत उमटले. विरोधकांनी गुन्हा रद्द करण्याची मागणी केली ( Dismiss Complaint Against Darekar ) तर सत्ताधारी अटकेवर ठाम ( Arrest Pravin Darekar ) होते. त्यामुळे विधानपरिषदेचे कामकाज तहकूब करण्यात ( Maharashtra Legislative Council Were Adjourned ) आले.

प्रवीण दरेकर
प्रवीण दरेकर

By

Published : Mar 15, 2022, 8:48 PM IST

मुंबई - मुंबै बॅंकेत मजूर भासवल्या प्रकरणी प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखला Complaint Lodged Agaist Pravin Darekar ) झाला. विधान परिषदेत याचे तीव्र पडसाद उमटले. विरोधकांनी गुन्हा मागे घेण्यासाठी ( Dismiss Complaint Against Darekar ) तर सत्ताधाऱ्यांनी अटकेची मागणी लावून ( Arrest Pravin Darekar ) धरली. सभागृहात झालेल्या गदारोळामुळे सुरुवातीला दोनदा आणि नंतर दिवसभरासाठी परिषदेचे कामकाज तहकूब करण्यात ( Maharashtra Legislative Council Were Adjourned ) आले.

गुन्हा सूडभावनेतून

विधान परिषदेत नियमित कामकाजाला सुरुवात होताच, भाजपाचे जेष्ठ सदस्य भाई गिरकर यांनी प्रविण दरेकर यांच्यावर दाखल झालेला गुन्हा सुडभावनेतून दाखल झाला आहे. या प्रकरणाचा निषेध करत, दरेकर मुंबै बँकेच्या निवडणुकीत मजूर संस्थेतून निवडून आले नसल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. सरकार विरोधात वेलमध्ये उतरुन गोंधळ घालण्यास सुरुवात केली. शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांनी यावर हरकत घेत, राजीनामा घेऊन अटक करण्याची मागणी केली. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली. सभापतींनी यासंदर्भात सरकारकडून माहिती घेऊन ती सभागृहासमोर ठेवली जातील, असे सांगितले. मात्र, विरोधकांचा गोंधळ सुरुच राहिल्याने गोंधळात सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास पुकारात कामकाज रेटून नेण्याचा प्रयत्न केला. गदारोळ झाल्याने पहिल्यांदा २५ मिनिटांसाठी कामकाज स्थगित केले.

मग या सगळ्यांवर गुन्हे दाखल करणार का..?

पुन्हा कामकाजाला सुरुवात झाल्यावर भाजप सदस्य प्रसाद लाड यांनी राज्य सरकार विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप केला. तसेच दरेकर यांच्या विरोधातील गुन्हा रद्द करण्याची मागणी केली. राज्यात २५ हजार मजूर संस्था असून, त्यातील 90 टक्के सदस्य सत्ताधारी पक्षांशी संबंधीत आहेत. मग या सगळ्यांवर गुन्हे दाखल करणार का..? असा प्रश्न लाड यांनी उपस्थित केला. दरेकर यांनी मजूर संस्थेचा यापूर्वीच राजीनामा दिलेला आहे, मुंबई बँके संदर्भातील दहा चौकशींमध्ये न्यायालयाने कोणतीही कारवाई करू नये. असे निर्देश दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दोन्ही बाजूने गदारोळ सुरु राहिल्याने वीस मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले. त्यानंतर कामकाज सुरु झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी दरेकरांना अटक करावी तर विरोधकांनी गुन्हे मागे घेण्यासाठी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. कामकाजात अडथळा निर्माण झाल्याने सभापती रामराजे नाईक - निंबाळकर यांनी दिवसभरासाठी कामकाज तहकूब केले.

ABOUT THE AUTHOR

...view details