मुंबई - ठाण्यातील महाप्रबोधन यात्रेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे, नेते भास्कर जाधव, उपनेत्या अनिता बिर्जे आणि खासदार विनायक राऊत यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणामध्ये नक्कल केल्यामुळे ठाण्यात या तिन्ही नेत्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. कलम 153, 500 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्याच्या गडकरी रंगायतन या नाट्यगृहात महाप्रबोधन यात्रेचा जाहीर मेळावा झाला. या मेळाव्यामध्ये प्रक्षोभक आणि चिथावणीखोर वक्तव्य करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मालिन केल्याचा शिंदे गटाने ठाकरे गटातील नेतेमंडळींवर केला आहे. राजकीय सुडपोटी कारवाईचा आरोप एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना आणि राज्य सरकारच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आता रान उठवायला सुरुवात केली आहे.
ठाण्यातून जनप्रबोधन यात्रा सुरू करण्यात आले असून गडकरी रंगायत्यांमध्ये झालेल्या भाषणादरम्यान नेत्यांनी कोणतेही आक्षेपार्य भाष्य केलेले नाही. तसेच, इतर कोणत्याही नेत्यांची टिंगल टवाळी करण्यात आलेली नाही. मात्र, सध्या राज्य सरकारकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे. पोलिसांवर दबाव टाकून अशा प्रकारची गुन्हे नेत्यांवर दाखल करण्यात आला असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेता संजना घाडी यांनी केला आहे. तसेच आपल्या विरोधात जे बोलतील त्यांच्यावर दंड शाही केली जाईल हे सांगण्याचा प्रयत्न सरकार करत आहे असा आरोपही उपनेता सुषमा अंधारे यांनी ही केला आहे.
जैसी करणी, वैसी भरणी - ठाण्यातील महाप्रबोधन यात्रेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यावर टिंगल टवाळी केली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वापरलेल्या अपशब्दामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. थेट त्यांना जेवणाच्या ताटावरून पोलिसांनी नेले होते. त्यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यावेळी व्यक्ती स्वातंत्र्य कुठे गेले होते? अशा पद्धतीने लोकांना अटक करण्याचा पायंडा तात्कालीन सरकारनेच पाडला आहे. ही दिशा विरोधकांनीच दाखवलेली आहे. त्यामुळे आता आरडाओरड करण्याची कोणतीही गरज नाही, असा टोला बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लगावला आहे.