मुंबई -राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात सोशल मीडियावर बदनामकारक मजकूर आणि अपशब्द वापरणाऱ्यांविरोधात कारवाई करावी, अशी लेखी तक्रार करण्यात आली होती. मुंबई भाजपाचे सरचिटणीस मोहित भारतीय यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सांताक्रूझ पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच अपशब्द वापरणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
देवेंद्र फडणवीसांविरोधात सोशल मीडियावर शिवीगाळ करणाऱ्यावर गुन्हा दाखल - देवेंद्र फडणवीस
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात सोशल मीडियावर बदनामकारक मजकूर आणि अपशब्द वापरणाऱ्यांविरोधात कारवाई करावी, अशी लेखी तक्रार करण्यात आली होती. मुंबई भाजपाचे सरचिटणीस मोहित भारतीय यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सांताक्रूझ पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
देवेंद्र फडणवीसांविरोधात सोशल मीडियावर शिवीगाळ करणाऱ्यावर गुन्हा दाखल
काही लोक अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली देवेंद्र फडणवीस यांचा अपप्रचार करत आहेत. याविरोधात कारवाई करण्यासाठी सायबर सेलकडे मागणी करण्यात आलेली आहे असं मोहित भारतीय यांनी सांगितले.