मुंबई -राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत ( Power Minister Nitin Raut ) यांचा पुतण्या असल्याचे सांगत 11 जणांना फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे. नोकरी देण्याच्या बहाण्याने लोकांची फसवणूक ( Fraud under pretext of giving job ) केल्याप्रकरणी दादर पोलीस स्टेशनमध्ये संदीप राऊत या आरोपीविरोधात 30 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दादर पोलीस करत असून यामध्ये लाखो रुपयांची माया संदीप राऊत याने कमवली असल्याचा प्राथमिक तपासात माहिती समोर आली आहे. आरोपी संदीप राऊत फरार असून दादर पोलिसांकडून शोध सुरू आहे.
अनेक तरुणांना नोकरी देण्याचे आश्वासन - मिळालेल्या माहितीनुसार संदीप राऊत याने ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचा पुतण्या असल्याचे सांगत अनेक तरुणांना नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. या 11 तरुणांकडून लाखो रुपये घेतल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी या आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.