महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मोहन डेलकर आत्महत्येप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - mohan delkar news

मोहन डेलकर यांनी मुंबईतील सी ग्रीन हॉटेलमध्ये आत्महत्या केल्यानंतर सापडलेल्या सुसाईड नोटच्या संदर्भात एसआयटी चौकशीची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधान भवनात केली होती. यानंतर आता मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मोहन डेलकर आत्महत्येप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मोहन डेलकर आत्महत्येप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By

Published : Mar 10, 2021, 8:20 AM IST

Updated : Mar 10, 2021, 8:45 PM IST

मुंबई : दादरा व नगर-हवेलीचे दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाच्या एसआयटी चौकशीची घोषणा कालच गृहमंत्र्यांनी केली होती. दरम्यान, डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणात अभिनव डेलकर यांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार सुसाईड नोटमधील नावातील प्रत्येकावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.

एफआयआरची प्रत.
एफआयआरची प्रत.

मोहन डेलकर यांनी मुंबईतील सी ग्रीन हॉटेलमध्ये आत्महत्या केल्यानंतर सापडलेल्या सुसाईड नोटच्या संदर्भात एसआयटी चौकशीची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधान भवनात केली होती. यानंतर आता मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

काय म्हणाले होते गृहमंत्री?

मोहन डेलकर यांच्या पत्नी आणि त्यांचे पुत्र अभिनव मोहन डेलकर यांनी गृहमंत्र्यांना पत्र दिले. त्यात त्यांनी प्रफुल खेडा यांच्यावर आरोप केलेत. माझे वडील गेल्या अनेक महिन्यांपासून स्थानिक प्रशासक प्रफुल खेडा यांच्यामुळे दबावात होते, असा आरोप या पत्रात करण्यात आला आहे. गृहमंत्री म्हणाले, त्यांनी आत्महत्या महाराष्ट्रात केली याचा अर्थ त्यांचा महाराष्ट्राच्या प्रशासनावर विश्वास आहे. यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी एसआयटी करण्यात येईल.

डेलकर कुटुंबीयांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट -

डेलकर कुटुंबीयांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. याप्रमाणे आम्ही त्यांना संरक्षण देत आहोत आणि या प्रकरणाची चौकशी एसआयटीतर्फे करणार आहोत, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

हेही वाचा -मुख्यमंत्री ठाकरेच सचिन वझेंचे वकील - देवेंद्र फडणवीस

सुसाईड नोट -

आत्महत्या करण्याच्या अगोदर मोहन डेलकर यांनी सहा पानांची गुजराती भाषेत सुसाईड नोट लिहिलेली होती. या सुसाईड नोटमध्ये दादरा नगर हेवेलीमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत वाद सुरू असल्याचा उल्लेख आढळून आला आहे. आपण या अधिकाऱ्यांशी चर्च करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र हे अधिकारी आपलं ऐकूण घेत नव्हते, असाही उल्लेख या सुसाईड नोटमध्ये असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. दादरा नगर हवेलीचे काही प्रशासकीय अधिकारी आणि डेलकर यांच्यामध्ये वाद सुरू होते, आणि यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा सुरू आहे. याचबरोबर त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये अन्य काही बाबिंचा देखील उल्लेख केला आहे. खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली, त्यांच्या आत्महत्येने खळबळ उडाली असून, आत्महत्येबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. डेलकर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.

हेही वाचा -मनसुख हिरेन प्रकरण : सचिन वझेंचा शिवसेनेशी थेट संबंध नाही - मुख्यमंत्री ठाकरे

Last Updated : Mar 10, 2021, 8:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details