महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 16, 2022, 7:56 AM IST

Updated : Aug 16, 2022, 8:45 AM IST

ETV Bharat / city

Prakash Surve Provocative Statement तंगडी तोडा दुसऱ्या दिवशी जामीन करून देतो आमदार प्रकाश सुर्वेंचे प्रक्षोभक वक्तव्य

बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे यांनी 14 ऑगस्टला दहिसर कोकणीपाडा बुद्ध विहार येथील कार्यक्रमात हात नाही तोडता आला तर तंगडी तोडा दुसऱ्या दिवशी जामीन करून देतो त्याची तुम्ही चिंता करू नका असे प्रक्षोभक आणि चिथावणीखोर वक्तव्य MLA Prakash Surve केले आहे यावरून माजी नगरसेवक उदेश पाटेकर Former Corporator Udesh Patekar यांनी दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Prakash Surve Provocative Statement
आमदार प्रकाश सुर्वेंचे प्रक्षोभक वक्तव्य

मुंबई कोणतीही दादागिरी खपवून घ्यायची नाही. कोणी आरे केले त्याला कारे करा. हात तोडता नाही आला तर तंगडी तोडा दुसऱ्या दिवशी जामीन करून देतो असे चितावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी माजी नगरसेवक उदेश पाटेकर Former Corporator Udesh Patekar यांनी दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. . आमदार प्रकाश सुर्वे MLA Prakash Surve यांनी कोकणीपाडा येथील कार्यक्रमात चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी नगरसेवकांनी संताप व्यक्त करीत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.


आमदार प्रकाश सुर्वे यांचे प्रक्षोभक वक्तव्य बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे यांनी 14 ऑगस्टला दहिसर कोकणीपाडा बुद्ध विहार येथील सार्वजनिक कार्यक्रमात यांना यांची जागा दाखवल्याशिवाय आपण गप्प बसायचे नाही. कुणाचीही दादागिरी खपवून घ्यायची नाही. कुणी आरे केले तर त्याला कारे करा. प्रकाश सुर्वे इथे बसलाय त्यांना ठोकून काढा. हात नाही तोडता आला तर तंगडी तोडा. दुसऱ्या दिवशी जामीन करून देतो त्याची तुम्ही चिंता करू नका असे प्रक्षोभक आणि चिथावणीखोर आशयाचे वक्तव्य सुर्वे यांनी केली आहे. त्यांच्या भाषणातील काही भाग व्हायरल होत आहे.


गुन्हा दाखल करण्याची शिवसेनेची मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक उदेश पाटेकर यांनी या विरोधात आक्रमक होत कायदा सुव्यवस्था लोकशाही संविधान यांचे धिंडवडे काढणाऱ्या या आमदार प्रकाश सुर्वे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पोलिसांकडे केली आहे. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीदेखील या प्रकरणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला आहे.

हेही वाचा Parsi New Years 2022 असा साजरा केला जातो पारशी नववर्ष दिवस जाणून घ्या इतिहास

Last Updated : Aug 16, 2022, 8:45 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details