महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

INS Vikrant fund case: विक्रांतप्रकरणी सोमैया पिता - पुत्रावर गुन्हा दाखल, माजी सैनिकाने केली तक्रार

आयएनएस विक्रांत ( INS Vikrant fund case ) प्रकरणी कोट्यवधींच्या निधी अपहारप्रकरणी भाजप नेते किरीट सोमैया ( Case filed against kirit Somaiya and his son ), त्यांचा मुलगा नील आणि इतर जणांविरुद्ध ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी सैनिकाने केलेल्या फसवणुकीच्या तक्रारीवर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

case filed against kirit Somaiya and his son
किरीट सोमैया गुन्हा दाखल विक्रांत प्रकरण

By

Published : Apr 7, 2022, 8:08 AM IST

Updated : Apr 7, 2022, 11:41 AM IST

मुंबई - आयएनएस विक्रांत ( INS Vikrant fund case ) प्रकरणी कोट्यवधींच्या निधी अपहारप्रकरणी भाजप नेते किरीट सोमैया ( Case filed against kirit Somaiya and his son ), त्यांचा मुलगा नील आणि इतर जणांविरुद्ध ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी सैनिकाने केलेल्या फसवणुकीच्या तक्रारीवर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विक्रांतच्या नावाखाली कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप केला होता.

माहिती देताना पोलीस अधिकारी

हेही वाचा -केंद्रीय तपास यंत्रणेच्या कारवाईमुळे मुख्यमंत्र्यांचे राजकीय वलय कमी होतेय - राजकीय विश्लेषक

महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर किरीट सोमैयांकडून सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. मात्र, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमैयांनी आयएनएस विक्रांतचे संग्रहालय करण्यासाठी सर्व सामान्यांकडून जमवलेला कोट्यवधींचा निधी राज्यपालांना दिलाच नसल्याचे प्रकरण उघडकीस आणले आहे. सोमैयांचा नवा घोटाळा असून देशासोबत प्रतारणा केल्याप्रकरणी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर माजी सैनिक बबन भोसले यांनी रात्री उशिरा ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार केली. पोलिसांनी सोमैया पिता-पुत्रांवर कलम 420, 406 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे, सोमैया पिता - पुत्रांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

हेही वाचा -Former Minister Anil Deshmukh : अनिल देशमुख यांना जेजे रुग्णालयातून डिस्चार्ज, उद्या सीबीआय ताबा घेण्याची शक्यता

Last Updated : Apr 7, 2022, 11:41 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details