मुंबई - मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमदार भाई जगताप यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. काँग्रेसचे शनिवारी (12 जून) पेट्रोल दरवाढीविरोधात गोरेगावमध्ये आंदोलन सुरु होते. यावेळी कार्यकर्त्यांना सूचाना देण्यासाठी आलेल्या पोलिसांसोबत भाई जगताप यांची बाचाबाची झाली. यावेळी जगताप यांनी एका पोलीस कॉन्स्टेबलला धक्का देखील दिला. हा पूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. या प्रकरणी भाई जगताप व गौरव राणे यांच्यासह 40 ते 50 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
40 ते 50 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल