मुंबई -प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी ( Nupur Sharma on Prophet Muhammad ) केल्याच्या आरोपाखाली भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा ( Case against BJP spokesperson Nupur Sharma ) दाखल केला आहे. नुपूर यांनी ज्ञानवापी मस्जिद संदर्भात एका टीव्ही न्यूज चॅनेलवर चर्चेदरम्यान आक्षेपार्ह बोलल्याचा आरोप आहे. रझा अकादमीकडून याबाबत तक्रार ( case against Nupur Sharma by raza academy ) करण्यात आली होती. त्यानंतर पायधुनी पोलीस ठाण्यात तक्रारीची ( Nupur Sharma case Mumbai ) दखल घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा -Sambhaji Raje : संधी, साळसूदपणाचा आव आणि धोका.. भाजपनेच केला संभाजी राजेंचा 'राजकीय गेम'?
रझा अकादमीचे मुंबई विभागाचे जॉईन्ट सेक्रेटरी इरफान शेख यांनी तक्रार केली. यात, एका टीव्ही न्यूज चॅनेलवरील कार्यक्रमात ज्ञानवापीविषयी चर्चा सुरू होती. या चर्चेत भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद ( Prophet Muhammad ) आणि त्यांची पत्नी हजरत आयेशा यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली. नुपूर यांच्या विधानाने मुस्लीम धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत, असे तक्रारदार शेख यांनी सांगितले आहे. याप्रकरणी पोलिसांनी कलम २९५ अ, १५३ अ आणि ५०५ (२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
पुण्यातही केस दाखल -ज्ञानवापी विषयावर एका इंग्रजी वाहिनीवरील बातम्यांच्या चर्चेदरम्यान प्रेषित मुहम्मद यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याने दिलेल्या तक्रारीवरून पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यात ३१ मे रोजी एफआयआर दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा -त्या 269 शाळेतील मुलांचे भविष्य सुरक्षित करा, आमदार नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना आवाहन