मुंबई -भाजप नेते मोहित कंबोजविरोधात ( Case filed against Mohit Kamboj ) गुन्हा दाखल. आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी गुन्हा दाखल केला. कर्ज बुडवल्याप्रकरणी हा गुन्हा ( Mohit Kamboj news ) दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
माहिती देताना भाजप नेते मोहित कंबोज हेही वाचा -भाजीपाला कडाडला! टोमॅटो 60 रुपये किलो; वाचा आजचे नवे दर
गुन्हा दाखल झाल्यावर भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्विटरवरून नाराजी व्यक्त केली. माझ्या सुत्रानुसार, पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी माझ्याविरुद्ध ईओडब्ल्यू मध्ये खोटा एफआयआर नोंदवला. जुने प्रकरण जे आधीच सेटल झालेले आहे, त्याप्रकरणी माझ्यावर गुन्हा दाखल करून मी घाबरून जाईल असे तुम्हाला वाटत असेल तर, हा तुमचा गैरसमज आहे. मी तथ्यांसह न्यायालयात जाईल, असे कंबोज ट्विटरवर म्हणाले.
कंबोज यांच्या कंपनीने २०११ ते २०१५ या कालावधीत इंडियन ओव्हरसिज बँकेकडून ५२ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. पण, ते कर्ज ज्या कारणासाठी घेतले होते त्यासाठी त्याचा वापर न करता ती रक्कम इतर ठिकाणी वापरण्यात आल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यानंतर ते कर्ज बुडवले होते. याप्रकरणी कंबोज आणि त्यांच्या कंपनीच्या 2 संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक व कट रचल्याचा त्यांच्याविरोधात आरोप आहे. कंबोज यांनी स्वतः ट्वीट करून त्यांच्याविरोधातील आरोप फेटाळले आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार इंडियन ओव्हरसिज बँकेचे मुख्य प्रादेशिक व्यवस्थापक यांनी या प्रकरणात तक्रार दिली होते. पोलिसांनी कंपनी आणि तिच्या तीन संचालकांवर गुन्हा दाखल केला आहे. कंपनीने 2011 ते 2015 दरम्यान बँकेकडून 52.8 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. तक्रारीमध्ये असे म्हटले आहे की, कर्ज ज्या कामासाठी घेण्यात आले होते त्यासाठी वापरण्यात आले नाही. बँकेची अंतर्गत चौकशी सुरू असताना ही बाब समोर आली असेही पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी कंबोज आणि इतर दोन संचालकांवर कलम 409, 420 नुसार फसवणूक आणि अप्रामाणिकपणे मालमत्तेच्या वितरणास प्रवृत्त करणे अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा -Municipal Corporation : महापालिका आयुक्तांनी काँग्रेस संपवण्याची सुपारी घेतली, रवी राजा यांचा खळबळजनक आरोप