महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Car Van Tourism कारव्हॅन टुरिझमला महाराष्ट्रात मोठी संधी, फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास - Car Van Tourism Has Big Opportunity In Maharashtra

अनेक देशांत प्रसिद्ध असणारे कारव्हॅन पर्यटन Car Van Tourism आता महाराष्ट्रातही Maharashtra Tourism सुरू होणार आहे. कारव्हॅन पर्यटन म्हणजेच पर्यटन स्थळी आपले घर. उपमुख्यमंत्री फडणवीस Devendra Fadnavis यांच्या सागर निवासस्थानी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात www.caravaanlife.com या पोर्टलचे अधिकृतपणे अनावरण करण्यात आले. लवकरच हि सेवा महाराष्ट्रात सुरू होत आहे.

carvan portal launch
कारव्हॅन पोर्टल लाँच

By

Published : Aug 27, 2022, 5:07 PM IST

मुंबईजगभरात प्रसिद्ध असणारे कारव्हॅन पर्यटन Car Van Tourism आत्ता आपल्या राज्यातही Maharashtra Tourism सुरू होत आहे. हॉटेल जवळ नसणे, हॉटेलमध्ये खोल्या उपलब्ध नसणे, अव्वाच्या सव्वा भाडे आकारणे आदी समस्यांवर मात करून पर्यटकांना नितांत आनंद लुटता यावा यासाठी कारव्हॅन पर्यटनाचा म्हणजेच पर्यटन स्थळी आपले घर, हा अनुभव राज्यातील पर्यटकांना मिळणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या सागर निवासस्थानी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात www.caravaanlife.com या पोर्टलचे अधिकृतपणे अनावरण करण्यात आले.

यावेळी बोलताना कारव्हॅन टुरिझमला महाराष्ट्रात मोठी संधी आहे, Car Van Tourism Has Big Opportunity In Maharashtra असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. याप्रसंगी, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, Tourism minister Mangal Prabhat Loadha पोर्टलच्या संस्थापक, संचालिका अनुलिका अर्सिवाल Anulika Arsival आदी मान्यवर हजर होते. या पोर्टलमार्फत पर्यटकांना कारव्हॅन भाड्याने Car Van On Rent दिली जाईल. तसेच पर्यटन स्थळी कारच्या पार्किंगसाठीही जागा आरक्षित केली जाईल. पर्यटन स्थळांची माहिती, पर्यटनासंबंधी सर्व माहिती या पोर्टलमध्ये असणार आहे.

काय आहे कारव्हॅन टुरीझमपर्यटनासाठी कारव्हॅन हा प्रकार युरोप अमेरिकेत अत्यंत लोकप्रिय आहे. कारव्हॅन लाईफच्या या कारव्हॅनमध्ये छोटी खोली, स्वयंपाक घर, बेडरूम, स्वच्छतागृह, २०० लिटरची पाण्याची टाकी, वेस्ट टॅंक, वातानुकूल यंत्र, फ्रीज, टीव्ही, गॅस, सिलेंडर आदी सर्व सोयी असतात. तसेच विजेसाठी बॅटरी बॅकअप असतो. पार्किंगच्या ठिकाणी तेथून वीज घेऊन उपकरणे चालवली जातात. जगात प्रसिद्ध असलेल्या कारव्हॅन टुरिझमला World famous caravan tourism आपल्याकडेही मोठी संधी आहे. पण आपल्याकडे हा प्रकार अद्याप सुनियोजित नसून त्याची सुरुवात कारव्हॅनलाइफ मार्फत होत आहे, ही आनंदाची बाब आहे.

राज्यात पर्यटनाला प्रोत्साहनPromotion of tourism in the state देणार असून कुटुंब आणि मित्रांसोबत एकत्र सुट्टी घालवण्यासाठी कार व्हॅन लाईव्ह सारखा उपक्रम राज्यात राबवतोय. सध्या कंपनीकडे पाच कारव्हॅन असून लवकरच राज्यातील आणखी पंधरा कारव्हॅन नोंदणीकृत केल्या जातील. तसेच, राज्यात ५० किलोमीटरवर कारव्हॅन पार्क असेल. अशी माहीती मंत्री मंगल प्रभात लोढा Tourism minister Mangal Prabhat Loadha यांनी दिली. भविष्यात कर्नाटक, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड Karnatak Himachal Pradesh येथेही हा उपक्रम राबविला जाईल व पर्यटकांच्या मार्गदर्शनासाठी ॲपही काढले जाईल असे, अर्सिवाल Anulika Arsival म्हणाल्या.

हेही वाचा WhatsApp Privacy दिल्ली हायकोर्टाचा व्हॉट्सअ‍ॅपला मोठा झटका, व्हॉट्सअ‍ॅप प्रायव्हसी पॉलिसीवर CCI चौकशी सुरूच राहणार

ABOUT THE AUTHOR

...view details