महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कारचा अपघात; दोघांचा मृत्यू, सहा जखमी - Car accident news

अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धानिवरी येथे कारचा भीषण अपघात घडला आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, सहा जण जखमी झाले आहेत.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कारचा अपघात
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कारचा अपघात

By

Published : Jan 23, 2021, 6:33 PM IST

Updated : Jan 23, 2021, 7:12 PM IST

मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धानिवरी येथे कारचा भीषण अपघात घडला आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, सहा जण जखमी झाले आहेत.

कारचा टायर फुटल्याने घडला अपघात-

मुंबई माहीम येथील शेख कुटुंबीय वापी येथे एका लग्नसमारंभात जाण्यासाठी निघाले होते. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मुंबईहून गुजराच्या दिशेने जाणाऱ्या शेख कुटुंबियांच्या कारचा डहाणू तालुक्यातील धानिवरी येथे भीषण अपघात झाला. इको कारचा टायर फुटल्याने दुपारी दोन वाजताच्या सुमारास हा अपघात घडला.

दोघांचा मृत्यू; सहा जखमी-

अपघात घडला तेव्हा या कारमध्ये 10 प्रवासी होते. या भीषण अपघातात आई व एक चिमुकला अश्या दोघांचा जागीच मृत्यू झाला असून नाजमीन शेख (वय 46), मुझेन शेख (वय 1) अशी अपघातातील मृतकांची नावे आहेत. तर शाईन नाईक (४६ ), आशिक अली (६५), टूबा शेख (६), आतीफा शेख (९), जनाफ शेख (७ वर्षे), जोया शेख (६) व ड्रायव्हर अयान नाईक (२९) हे सहा जण जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असून जखमींना कासा उपजिल्हा रुग्णालयाला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा-'डाटा हस्तांतरण करण्याकरता फेसबुक कंपनीवर कर लागू करा'

Last Updated : Jan 23, 2021, 7:12 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details