मुंबई -राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्रांची शनिवारी राज्यभरात छाननी करण्यात आली. त्यामध्ये राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण दाखल ५५४३ उमेदवारांपैकी ४७३९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्रुटी आढळल्याने ७९८ उमेदवारांचे अवैध ठरवून नामंजुर झाले आहेत. सोमवार 7ऑक्टोबर पर्यंत अर्ज माघार घेण्याची अंतिम तारीख आहे. यामुळे आता अर्ज माघारी नंतरच राज्यातील २८८ विधानसभा लढतींचे चित्र स्पष्ट होईल.
हेही वाचा... मुख्यमंत्र्यांचा नामांकन अर्ज वैध, आशिष देशमुखांची मागणी फेटाळली
शनिवारी छाननी नंतर नंदुरबार जिल्ह्यात ४ मतदारसंघात ३६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. धुळे जिल्ह्यात ५ मतदारसंघात ५६ उमेदवार, जळगाव जिल्ह्यात ११ मतदारसंघात १५४ उमेदवार, बुलढाणा जिल्ह्यात ७ मतदारसंघात ७५ उमेदवार, अकोला जिल्ह्यात ५ मतदारसंघात १०१ उमेदवार, वाशिम जिल्ह्यात ३ मतदारसंघात ६० उमेदवार, अमरावती जिल्ह्यात ८ मतदारसंघात १५१ उमेदवार, वर्धा जिल्ह्यात ४ मतदारसंघात ५९ उमेदवार, नागपूर जिल्ह्यात १२ मतदारसंघात १८१ उमेदवार, भंडारा जिल्ह्यात ३ मतदारसंघात ६६ उमेदवार, गोंदीया जिल्ह्यात ४ मतदारसंघात ७१ उमेदवार, गडचिरोली जिल्ह्यात ३ मतदारसंघात ४४ उमेदवार, चंद्रपूर जिल्ह्यात ६ मतदारसंघात ९० उमेदवार, यवतमाळ जिल्ह्यात ७ मतदारसंघात १२५ उमेदवार, नांदेड जिल्ह्यात ९ मतदारसंघात ३२७ उमेदवार, हिंगोली जिल्ह्यात ३ मतदारसंघात ५४ उमेदवार, परभणी जिल्ह्यात ४ मतदारसंघात ८१ उमेदवार अर्ज वैध ठरले आहेत