मुंबई- आरटीओ भरतीमध्ये निवड होऊनही नोकरी मिळाली नाही. त्यामुळे मराठा समाजातील उमेदवार विद्यार्थी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मंत्रालयासमोरील बंगल्यापुढे सोमवारी रात्री अंधारात बसले होते. चंद्रकांत पाटील हे त्या ठिकाणी येताच विद्यार्थ्यांनी त्यांना घेराव घालून दिलेल्या आश्वासनांबद्दल जाब विचारला. यावेळी त्याठिकाणी मोठा पोलीस फौजफाटा तैनात होता. पोलिसांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले.
राज्यातील सहाय्यक मोटार वाहन परीक्षेत 135 विद्यार्थ्यांना वगळल्या संबंधी परीक्षार्थी संतप्त होते. राज्य शासनाच्या 2014च्या निर्णयाप्रमाणे खुल्या वर्गातील तरुणांना शिफारसपत्र देण्यात आले होते. तरीही त्यांना वगळण्यात आले. आता 2018 मधील नव्या शासन निर्णयामुळे समांतर आरक्षणामधील खुल्या वर्गात राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संधी मिळाल्याने 135 मराठा तरुणांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे मराठा परिक्षार्थ्यांमध्ये संतापाजनक भावना आहे. त्यामुळेच संतप्त विद्यार्थ्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या बंगल्यावर जाऊन जाब विचारण्याचे ठरवले. मराठा समाजातील विद्यार्थ्यांची हे सरकार फसवणूक करत असल्याचे यावेळी हे विद्यार्थ्यांनी म्हटले.