मुंबई -मालाड पश्चिम येथे राहणारे राजू उर्फ राजन कातकर यांना कॅन्सरचा आजराने ग्रासले आहे. घरची परिस्थीती हालाकीची असल्यामुळे कातकर यांनी आपल्या घराच्या बाहेर मदत मिळण्यासाठी एक फलक लावले. "मला कॅन्सर झाला आहे, उपचारासाठी तुम्हाला शक्य होईल ती आर्थिक मदत म्हणून डोनेशन बॉक्स मध्ये टाकण्यात यावी", असे आवाहन त्यांनी केले आहे.
घरची परिस्थिती देखील कठीण-
राजू कातकर हे कोरोनाच्या अगोदर दिवसा इस्टेट एजंट आणि संध्याकाळी वडापाव विकून आपल्या घराची परिस्थिती सांभाळत होते. परंतु लॉकडाऊन मध्ये प्रथम त्यांना कावीळ हा आजार झाला, असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. एक ते दोन महिने त्यावर उपचार देखील घेण्यात आले. तरी देखील त्यांना बर वाटले नाही. घरची परिस्थिती देखील कठीण असल्यामुळे नातेवाईकांकडून काही आर्थिक मदत देखील घेण्यात आली. परंतु त्यांना कावीळ नंतर डॉक्टरांनी कॅन्सर आजर असल्याचे सांगितले.