महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

लॉकडाऊनमध्ये अॅमेझॉनकडून बिगर जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा; सीएआयटीकडून कारवाईची मागणी

अनेक राज्यांत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. तरीही ई-कॉमर्स कंपन्यांकडून बिगर जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा केला जात असल्याचे सीएआयटीने म्हटले आहे. याबाबत पत्र व्यापारी संघटनेचे महासचिव प्रवीण खंडेलवाल यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना लिहिले आहे.

E commerce
ई कॉमर्स

By

Published : Apr 27, 2021, 6:04 PM IST

मुंबई - अखिल भारतीय व्यापारी संघटनेने (सीएआयटी) केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांना पत्र लिहून ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कोरोनाच्या काळात निर्बंध असतानाही या ई-कॉमर्स कंपन्यांकडून बिगर जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा केला जात असल्याचा सीएआयटीने आरोप केला आहे.


कोरोना महामारीच्या काळाचा ई-कॉमर्स कंपन्यांकडून गैरफायदा घेतला जात आहे. अनेक राज्यांत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. तरीही ई-कॉमर्स कंपन्यांकडून बिगर जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा केला जात असल्याचे सीएआयटीने म्हटले आहे. याबाबत पत्र व्यापारी संघटनेचे महासचिव प्रवीण खंडेलवाल यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना लिहिले आहे.

हेही वाचा-'लस उपलब्ध नसेल तर, 1 मेपासून सुरू होणारी लसीकरण मोहीम राबवायची कशी'


काय म्हटले आहे पत्रात ?

  • ई-कॉमर्स कंपन्यांकडून महामारीच्या काळात लहान व्यापारांचा बाजारपेठेतील हिस्सा बळकाविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा व्यापारी संघटनेने दावा केला आहे. त्यासाठी ई-कॉमर्स कंपन्यांकडून मोबाईल फोन आणि त्यांचे अॅसेसरीजही जीवनावश्यक असल्याचे म्हटले जात आहे.
  • केंद्र सरकारने कशाला परवानगी आहे, कशावर निर्बंध आहे, याची स्पष्ट माहिती देणारी प्रसिद्धी पत्रक काढावी, असी सीएआयटीने मागणी केली आहे.
  • ही प्रक्रिया त्वरित करून स्थानिक उद्योगांना विदेशी उद्योगांपासून वाचवावे, अशी व्यापारी संघटनेने पत्रातून केंद्रीय मंत्री गोयल यांच्याकडे मागणी केली आहे.
  • ई-कॉमर्स कंपन्या या मोठ्या कंपन्या असल्याने त्यांनी नियमांचे उल्लंघन करूनही सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही सीएआयटीने केला आहे.

हेही वाचा-रशियाची 'स्पूटनिक व्ही' लस मे अखेर भारतामध्ये उपलब्ध होणार
दरम्यान, ई-कॉमर्स कंपन्यांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप वारंवार सीएआयटीने आजवर केले आहेत. कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असल्याने बहुतांश राज्यांनी बिगर जीवनावश्यक वस्तुंच्या विक्रीवर वेळेची मर्यादा घालून दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details