मुंबई -देवेंद्र फडणवीस यांना टीका करण्याशिवाय दुसरे काही काम आहे का? मला त्यांच्याविषयी सहानुभूती आहे, आमचे सरकार थोडे थोडे दिवस करून पाच वर्ष पूर्ण करतील, असा विश्वास मंत्री जयंत पाटील यांनी आज बुधवारी मंत्रालयातील बैठकीनंतर व्यक्त केला. 'जनतेने आम्हाला जनमत दिले होते, मात्र शिवसेनेने बेईमानी केली', अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पालघरमध्ये केली. त्यांच्या त्या वक्तव्याचा समाचार मंत्री जयंत पाटील यांनी घेतला आहे.
अर्थमंत्री जयंत पाटील यांची प्रतिक्रिया... हेही वाचा... 'मोदी सरकारचा फसविण्यावर आणि बढाया मारण्यावर विश्वास'
देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर देताना जयंत पाटील यांनी फडणवीस यांना चांगलाच टोला लगावला आहे. 'देवेंद्र फडणवीस यांना टीका करण्याशिवाय दुसरे काम आहे का, मला त्यांच्याविषयी सहानुभूती आहे. आमचे सरकार थोडे थोडे दिवस करून पाच वर्ष पूर्ण करतील, असे पाटील यांनी म्हटले आहे.
हेही वाचा... विनाअनुदानित गॅस सिलिंडर १९ रुपयाने महाग
काय म्हणाले होते फडणवीस ?
जनतेने आम्हाला जनमत दिले होते, मात्र शिवसेनेने बेईमानी केली अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पालघरमध्ये झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केली. वर्गात पहिला आलेल्या मुलाला बाहेर बसवण्यात आले, असाही टोला फडणवीस यांनी लगावला होता. एवढेच नाही तर ठाकरे सरकारवरही त्यांनी टीका केली. शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफीची घोषणा देणार होती. मात्र, ते आश्वासन ठाकरे सरकारने पाळले नाही, अशीही टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.
जीएसटी बाबत मंत्रीमंळाची बैठक...
'आमची बैठकी जीएसटी आणि राज्याचा महसूल कसा वाढवायचा यावर होती. खातेवाटप जाहीर करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, ते लवकर जाहीर करतील. काँग्रेसने जादा खाती मागितली आहे का, याबाबत मला माहित नाही. जीएसटी लागू झाल्यानंतर राज्याचे उत्पन्न कमी झालेले आहे, त्याचा आज आढावा घेतला. जीएसटीचे आयुक्त आले होते त्यांनी सध्याचे चित्र आमच्यासमोरमांडले , असे जयंत पाटील म्हणाले.
हेही वाचा... डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया 'वंचित'मधून बाहेर
पीएमसी बँकेचा राज्य सहकारी बँकेत विलिनीकरण व्हावा, असा आमचा प्रयत्न होता. मात्र राज्य सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्रापुरते आहे. तर पीएमसी बँकेचे कार्यक्षेत्र दोन-तीन राज्यांमध्ये आहे. त्यामुळे मल्टीस्टेट को-ऑपरेटिव बँक असल्यामुळे ती एका राज्याच्या बँकेत विलीन होणे शक्य नाही. त्यात कायदेशीर अडचणी आहेत. ती दुसऱ्या कुठल्या तरी बँकेत विलीन होईल, हे पाहणे आवश्यक आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्तारावरून नाराजी आहे. ती दूर करण्यात तीनही पक्ष यशस्वी होतील, असे जयंत पाटील शेवटी म्हणाले.