महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Cabinet Expansion Invitation: अजित पवारांसह केंद्रीय मंत्र्यांना मंत्रिमंडळ विस्ताराचे आमंत्रण - अजित पवारांना मंत्रिमंडळ विस्ताराचे आमंत्रण

अवघ्या राज्याची उत्सुकता लागून राहिलेल्या शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार ( maharashtra cabinet expansion ) उद्या होणार असल्याचं निश्चित झालेलं आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार ( cabinet expansion invitation to Ajit Pawar ) यांना शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचं आमंत्रण ( Invitation to Cabinet expansion of Shinde Fadnavis government ) दिलं गेल्याची सूत्रांची माहिती आहे.

MLA Ajit Pawar
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार

By

Published : Aug 8, 2022, 10:58 PM IST

मुंबई : अवघ्या राज्याची उत्सुकता लागून राहिलेल्या शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार ( maharashtra cabinet expansion ) उद्या होणार असल्याचं निश्चित झालेलं आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार ( cabinet expansion invitation to Ajit Pawar ) यांना शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचं आमंत्रण ( Invitation to Cabinet expansion of Shinde Fadnavis government ) दिलं गेल्याची सूत्रांची माहिती आहे.


दिग्गजांना शपथविधीला निमंत्रण -या मंत्रिमंडळ विस्तारासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे, नितीन गडकरी, रावसाहेब दानवे तसेच भारती पवार आणि भागवत कराड यांना देखील उद्याच्या शपथविधीला निमंत्रण दिले गेले आहे. मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिवसेना आणि भाजप यांच्या वतीने ज्या ज्या सदस्यांची नावे निश्चित झालेली आहे. त्या सर्वांना उद्या मंत्रिपदाची शपथ दिली जाण्याची शक्यता आहे. या शपथविधीच्या कार्यक्रमासाठी दरबार सभागृह राखीव ठेवण्यात आल्याची देखील माहिती मिळत आहे. जेणेकरून उद्याचा राज्याचा मंत्रिमंडळ विस्ताराचा शपथविधीचा कार्यक्रम अत्यंत नीटनेटका नियोजनबद्ध होईल.

राज्यातील प्रश्नांकडे लक्ष देणेही गरजेचे-गेल्या एक महिन्यापासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. राज्यातला पूरग्रस्त भाग, शेतकऱ्यांचे प्रश्न, भाव वाढ विविध स्तरावर जनतेचे प्रश्न त्याला सामोरे जाणं आणि प्रश्नांचा निपटारा करणं, यासाठी मंत्र्यांची मंत्रिमंडळाचा विस्तार होणे अत्यंत आवश्यक होतं. राज्यातील विरोधी पक्ष तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार आणि जनतेनेसुद्धा मंत्रिमंडळ विस्तार कधी होतंय याबद्दल सतत विचारणा शिंदे फडणवीस सरकारला केली होती. अखेर महिनाभरानंतर शिंदे फडणवीस सरकारने मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे नियोजन निश्चित केले. आता जनतेचे प्रश्न किमान मार्गी लागतील अशी अपेक्षा आता करूया.

हेही वाचा-Cabinet Expansion : शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार; 'या' नेत्यांना मिळणार संधी

ABOUT THE AUTHOR

...view details