मुंबई -कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सीबीएसई बोर्डाची बारावी परीक्षा रद्द केल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षांबाबत आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. तसेच बारावीची परीक्षा रद्द करण्यासंदर्भात आपत्ती व व्यवस्थापन विभागाकडे शालेय शिक्षण विभागाचा प्रस्ताव पाठवला जाणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
बारावी बोर्डाची परीक्षा रद्द होणार.. आपत्ती व व्यवस्थापन विभागाकडे प्रस्ताव, अधिकृत घोषणा बाकी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 12 वी बोर्डाची परीक्षा रद्द करण्यात येणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. याची लवकरच अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
लवकरच निर्णय जाहीर करणार -
कोरोनाची सध्याची परिस्थिती व आजाराचा मुलांवर होणारा वाढता प्रार्दुभाव आणि परीक्षेचा संभ्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनात वाढलेला तणाव विचारात घेता परीक्षा ऐवजी पर्यायी व्यवस्थेचा विचार करावा तसेच केंद्र सरकारने देश पातळीवर या संदर्भात एकसुत्र धोरण निश्चित करावे, ही मागणी महाराष्ट्र शासनाने केली होती. या मागण्यांचा विचार करता केंद्र सरकारने सीबीएसईची बारावीची परीक्षा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय हा निश्चितच स्वागतार्ह आहे. आम्ही या निर्णयाचे स्वागत केले आहे. मुलाच्या शैक्षणिक जीवनातील बारावी परीक्षा ही महत्त्वाची पायरी असली तरीही सध्याची परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षा ही आपल्या सर्वांची प्राथमिकता आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षांबाबत सखोलपणे चर्चा झालेली आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीची परीक्षा रद्द करण्यासंदर्भात आपत्ती व व्यवस्थापन विभागाकडे शालेय शिक्षण विभागाचा प्रस्ताव पाठवला जाणार आहे. त्यानंतर याची घोषणा केली जाईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
बारावीची परीक्षा रद्द होणार -
केंद्र सरकारने सीबीएसई बोर्डाची बारावी परीक्षा रद्द केल्यानंतर महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षांबाबत काय निर्णय होणार याकडे राज्यातील विद्यार्थीं वर्गांचे लक्ष लागून आहे. आजच्या मंत्रीमंडळाच्या बैंठकीनंतर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीची परीक्षा रद्द करण्यासंदर्भात आपत्ती व व्यवस्थापन विभागाकडे शालेय शिक्षण विभागाचा प्रस्ताव पाठवला जाणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीची परीक्षा रद्द होणार हे निश्चित असल्याचे बोलले जात आहे.