मुंबई- राज्यात अमली पदार्थ सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. याच्या प्रतिबंधासाठी राज्य सरकार राष्ट्रीय कृती योजना राबवणार आहे. यासाठी १३ कोटी खर्चाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवणार असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या पत्रकार दिली.
अमली पदार्थ सेवनाला राष्ट्रीय कृती योजना लावणार चाप
राज्यात अमली पदार्थ सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. याच्या प्रतिबंधासाठी राज्य सरकार राष्ट्रीय कृती योजना राबवणार आहे. यासाठी १३ कोटी खर्चाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवणार असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या पत्रकार दिली.
राज्यात अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे बोलले जाते. नुकतेच सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक झाली आहे. यावरुन राजकीय वातावरण तापले आहे. तरुणवर्ग अमली पदार्थांच्या आहारी जाण्याचे प्रमाण अधिक आहे. मानसिक तणाव, जीवनशैलीतील बदल, सामाजिक व आर्थिक कारणे इत्यादी महत्वाचे आहेत. त्यासाठी योजना तयार करुन त्यास प्रतिबंध घालणे ही काळाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अमली पदार्थांचे सेवन, गैरवर्तनाला आळा घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नागरिकांचे आरोग्य, पोषण आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत मद्यपान, दारु आणि अमली पदार्थांचे सेवन टाळण्यासाठीच्या मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक राष्ट्रीय कृती योजनेच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली, अशी माहिती मंत्री मुंडे यांनी दिली. तसेच राष्ट्रीय कृती योजनेच्या प्रस्तावासह सदर योजना राबविण्यासाठी सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाकरीता येणाऱ्या एकूण २ कोटी ७४ लाख व पुढील पाच वर्षासाठीचा एकूण रु १३ कोटी ७० लाख इतक्या रकमेचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी पाठवला आहे. या संदर्भातील प्रस्तावाला आज मान्यता दिल्याचे मंत्री मुंडे म्हणाले.
हेही वाचा : Cruise Drug Case : आर्यनला 'जेल की बेल'?; आज न्यायालय देणार निकाल