मुंबई -रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग दिल्ह्यांमध्ये पावसमुळे मोठे नुकसान झाले आहे. या जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनामुळे घरे, शेती, झाडे सगळेच उध्वस्त झाले आहे. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष देण्याचे स्पष्ट आश्वासन दिले असल्याची माहिती आमदार हुस्नबानू खलिफे यांनी ई टीव्ही भारत शी बोलताना दिली.
कोकणातील पूर आणि भूस्खलन यावर मुख्यमंत्र्यांचे विशेष लक्ष देण्याचे आश्वासन - आमदार हुस्नबानू खलिफे काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या वेळी खलिफे यांनी कोकणातील पूरपरस्थिती आणि काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या भूस्खलनाच्या घटनांमुळे अनेक घरे, शेती उद्धवस्त झाली आहे. जनतेचे आतोनात नुकसान झाल्याने त्यांना तातडीने चांगली मदत मिळावी अशी मागणी केली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली असल्याचे त्या म्हणाल्या.
कोकणात जवळजवळ तीन-चार वेळा पूर आलेला आहे. यावेळचा पूर महाभयंकर होता. तीन-चार दिवस आम्हाला घरातून बाहेर पडता आले नाही. कोकणातली सर्व वस्तुस्थिती आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आणून दिली. भूस्खलनाची बाबतीत विशेष टीम पाठवून तपास करण्यात यावा, नगर परिषदांना स्वच्छतेसाठी भरीव अनुदान द्यावे, पावसामुळे वाहून गेलेले रस्ते, पावसाळ्यात पडलेली घरे यांचाही विचार करण्यात यावा. त्यांना जास्तीत जास्त मदत उपलब्ध देण्यात यावी अशी मागणी आमदार हुस्नबानू खलिफे यांनी केली.
त्या पुढे म्हणाल्या, खेड, चिपळून, कणकवली, कुडाळ राजापूर या ठिकाणच्या बाजारपेठा या तीन दिवस पाण्याखाली गेल्या हेात्या. त्यामुळे या भागातील व्यापाऱ्यांचे फार मोठे नुकसान झालेले आहे. त्यांना तातडीने मदत देण्यात यावी, त्यांना 31 ऑगस्टपर्यंत टॅक्स भरण्याची मुदत आहे. त्यात सवलत देण्याचा विचार करण्यात यावा अशी ही मागणी प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांकडे केली. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या मागणीवर आपले कोकणाकडे लक्ष असल्याचे सांगत आपल्या सर्व मागणीवर सकारात्मक निर्णय घेऊन त्यासाठीची कार्यवाही केली जाईल असे मला आश्वासन दिले. कोकणासाठी विशेष विचार करू असे ही त्या म्हणाल्या.