महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

साताऱ्यात उदयनराजेंना धक्का, श्रीनिवास पाटलांचा दणदणीत विजय - श्रीनिवास पाटील राष्ट्रवादी

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल लागला आहे. येथे भाजपचे उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला आहे. जवळपास ८५ हजार मतांनी राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील हे विजय झाले आहेत. हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

कोण मारणार बाजी? पाटील की उदयनराजे

By

Published : Oct 24, 2019, 8:12 AM IST

Updated : Oct 24, 2019, 3:53 PM IST

मुंबई- संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या सातारा लोकसभेत धक्कादायक निकाल लागला आहे. अखेर राष्ट्रवादीने आपला गड राखला आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले उदयनराजे यांचा येथून पराभव झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीनिवास पाटील यांनी त्यांचा जवळपास ८५ हजार मतांनी पराभव केला. राष्ट्रवादी आणि भाजपने ही लढत प्रतिष्ठेची केली होती.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उदयनराजे भोसले यांच्यासाठी साताऱ्यात सभा घेतली होती. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही साताऱ्यावर विशेष लक्ष केंद्रीत केले होते. तर राष्ट्रवादीकडून स्वत: पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे श्रीनिवास पाटील यांच्यासाठी मैदानात उतरले होते. त्यांनीही श्रीनिवास पाटील यांच्यासाठी प्रचारसभा घेतल्या होत्या.

  • 1.30 -उदयनराजे 48 हजार मतांनी पिछाडीवर
  • उदयनराजे ३२ हजार मतांनी पिछाडीवर
  • श्रीनिवास पाटील ३२ हजार मतांनी आघाडीवर, उदयनराजे पराभवाच्या छायेत
  • उदयनराजे १० हजार मतांनी पिछाडीवर, श्रीनिवास पाटलांची आघाडी
  • साताऱ्यातून श्रीनिवास पाटील आघाडीवर..उदयनराजेंना धक्का?

मुंबई- संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या सातारा लोकसभेत धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येथे भाजपचे उदयनराजे भोसले हे जवळपास १ लाख मतांनी पिछाडीवर आहेत. येथून श्रीनिवास पाटील आघाडीवर आहेत. राष्ट्रवादी आणि भाजपने ही लढत प्रतिष्ठेची केली होती.

पवारांची ती ५ मिनिटे

शरद पवार यांची साताऱ्यात झालेल्या सभेची खूप चर्चा झाली होती. पवारांनी पडत्या पावसात श्रीनिवास पाटील यांच्यासाठी सभा घेतली होती. त्यानंतर राष्ट्रवादीसाठी एक आश्वासक वातावरण निर्माण झाले होते.

लोकसभा निवडणुका होऊन तीन महिन्यात राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आलेल्या उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे या ठिकाणी तीन महिन्यातच पोट निवडणूक घेण्यात आली.

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या सातारा लोकसभा पोट निवडणुकीसाठी २१ ऑक्टोबरला मतदान झाले होते. त्यानंतर या जागेसाठी आज मतमोजणीला सुरुवात झाली आहे. साताऱ्याची निवडणूक राष्ट्रवादी व भाजपने प्रतिष्ठेची केली आहे. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर तीनच महिन्यात या जागेसाठी पोट निवडणूक होत आहे. मोदी लाटेतही साताऱ्यातील जनतेने निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना निवडून दिले होते. मात्र या निकालामधून सातारा राष्ट्रवादीचा बाले किल्ला आहे की उदयनराजेंचा करिष्मा आहे हे स्पष्ट होणार आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील निवडणूक लढवत आहेत.

लोकसभा निवडणुका होऊन तीन महिन्यात राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आलेल्या उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे या ठिकाणी तीन महिन्यातच पोट निवडणूक घेण्यात आली. या ठिकाणी भाजपकडून उदयनराजे तर राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील मैदानात आहेत. आता या लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी आपले वर्चस्व कायम ठेवणार की रयतचे मताचे दान उदयनराजेंच्या पारड्यात पडणार हे पाहण्यासाठी अवघा महाराष्ट्र उत्सुक आहे.

सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. सातारा लोकसभा मतदारसंघात एकूण ६ विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी कराड उत्तर, सातारा, कोरेगाव वाई या मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार निवडून आले होते. तर कराड दक्षिणमध्ये काँग्रेसचे आणि पाटणमध्ये शिवसेनेचे वर्चस्व होते. सध्य स्थितीत सातारच्या दोन्ही राजांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने या ठिकाणी राष्ट्रवादीला फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच उदयनराजे समर्थक मोठ्या प्रमाणात असल्याने त्याचा फटका बसणार की राष्ट्रवादीच्या विचारसरणीला मत मिळणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.

Last Updated : Oct 24, 2019, 3:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details