मुंबई -दादर टीटी येथे २७ ऑक्टोबर रोजी सकाळी सव्वा सातच्या सुमारास बेस्ट बसने डंपरला धडक दिली. या धडकेत बसमधील ड्राइव्हर, कंडक्टरसह प्रवासी असे एकूण आठ जण जखमी झाले. त्यापैकी ५ जण गंभीर जखमी होते. या सर्वांवर सायन रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यापैकी बस ड्रायव्हर राजेंद्र यांचा आज सकाळी साडे सातच्या सुमारास मृत्यू झाल्याची माहिती सायन रुग्णालयाकडून देण्यात आल्याची पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
३ रुग्णांची प्रकृती स्थिर
बेस्ट उपक्रमाची बस मार्ग क्रमांक २२ ही मरोळ मोरोशी ते पायधुनी या मार्गावर चालते. २७ ऑक्टोबर रोजी सकाळी सव्वा सातच्या सुमारास दादर टीटी येथे या बसच्या चालकाने डम्परला मागून धडक दिली. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते. या धडकेमुळे बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या बसमधून प्रवास करणारे प्रवासी आणि कंडक्टर, ड्राइव्हर या अपघात जखमी झाले आहेत. जखमी ८ जणांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी कंडक्टर, ड्रायव्हर तसेच इतर तीन प्रवासी गंभीर जखमी झाले होते. तर इतर ३ रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सायन रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर यांनी दिली होती.
४ जणांना डिस्चार्ज