महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गोरेगावमध्ये बर्निंग बसचा थरार; प्रसंगावधान राखल्याने अनर्थ टळला - best bus

आग लागताच प्रसंगावधान ठेवून प्रवासी बसमधून खाली उतरल्याने जीवितहानी झालेली नाही.

गोरेगावमध्ये बर्निंग बसचा थरार

By

Published : May 3, 2019, 12:46 PM IST

मुंबई- पश्चिम उपनगरातील गोरेगाव येथे सकाळी गॅस गळतीमुळे एका बेस्ट बसला आग लागली. आग लागताच प्रसंगावधान ठेवून प्रवासी बसमधून खाली उतरल्याने जीवितहानी झालेली नाही. या आगीमध्ये पूर्ण बस जळून खाक झाल्याने बसचा फक्त सांगाडा उरला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सकाळी ७ वाजून २० च्या दरम्यान दिंडोशी डेपोची मार्ग क्रमांक ६४६ ची बस गोरेगाव स्टेशनकडून दिंडोशीकडे निघाली होती. ही बस गोकुळधाम मार्केट येथे नागरी निवारा प्रकल्प १ व २ जवळ आली असता बसमधून सीएनजी गॅसची गळती झाल्याचे चालक, वाहक आणि प्रवाशांच्या निदर्शनास आले. त्यानंतर चालक, वाहकासह बसमधून प्रवास करणारे ३ प्रवासी बसमधून बाहेर पडले. इतक्यात बसला आग लागली.

गोरेगावमध्ये बर्निंग बसचा थरार

गॅस गळतीमुळे आग लागली असल्याने आग सर्वत्र पसरली. मुंबई अग्निशमन दलाच्या २ वाहनांनी बसला लागलेली आग विझवली. सकाळीच आग लागल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ थांबण्यात आली होती. आगीवर नियंत्रण मिळवल्यावर बस दिंडोशी बस डेपोमध्ये नेण्यात आली आहे. या बसला सीएनजी गॅस गळतीमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती असली तरी बेस्टकडून याबाबत अधिक चौकशी केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details