अहमदनगर -शेवगाव तालुक्यातील रावतळे कुरूडगा येथे ऊस तोडणी मशिन चालू असताना मशिनने पेट घेतला. या घटनेत एक एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाल्याचे समोर आले आहे. हे ऊस तोडणी यंत्र शेवगाव तालुक्यातील वाळकी येथील साखर कारखान्याचे होते.
ऊस कापणीचे यंत्र पेटल्याने एक एकर ऊस जळून खाक; शेवगाव तालुक्यातील घटना आग लागल्याने शेकऱ्यांची धावपळ -
नगर तालुक्यातील वाळकी येथील कारखान्याचे ऊस तोडणी यंत्र तालुक्यातील रावतळे येथील ज्ञानेश्वर भराट यांचा दोन एकर ऊस तोडणीसाठी आले होते. ऊस तोडणी सुरु असतांना यंत्राने पेट घेतला. या आगीने भोवतालचा एक एकर ऊस जळून खाक झाला. ऊस तोडणी सुरू असताना मशीनने अचानक पेट घेतला आणि नंतर या आगीत आजूबाजूच्या उसाने क्षणार्धात पेट घेतला. यावेळी ऊस तोडणी मशीनचे कामगार आणि उपस्थित शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली. मात्र, आग विझवण्यासाठी लगेच पाणी उपलब्ध न झाल्याने दोन एकरा पैकी एक एकर ऊस जळून गेला.
साखर कारखाना भरपाई देणार का-
हे ऊस तोडणी मशीन नगर तालुक्यातील वाळकी येथील साखर कारखान्याचे होते. ऊस तोडणी यंत्र सदोष असताना ते का पाठवले आणि आता या नुकसानीची भरपाई संबंधित साखर कारखाना देईल का असा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबाला पडला आहे.