महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना हक्काचा निवारा...जाणून घ्या कोणाला 'कोणता' बंगला - 'सागर' बंगला

आज मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि मंत्र्यांना बंगले वाटप करण्यात आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या निवास स्थानसाठी प्रसिद्ध असलेला 'वर्षा' बंगला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणविसांना 'सागर' बंगला देण्यात आला आहे.

bunglow of ministers
मंत्र्याचे बंगले

By

Published : Dec 3, 2019, 1:55 PM IST

मुंबई -सत्तापरिवर्तनानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. यानंतर कोणत्या नेत्याला कोणता बंगला मिळणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती. अखेर उद्धव ठाकरे यांच्या सोबत शपथ घेतलेल्या नेत्यांपैकी एकनाथ शिंदे, जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांना सामान्य प्रशासन विभागाने बंगल्याचे वाटप केले आहे. यासोबतच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना देखील शासकीय बंगला देण्यात आला आहे.

मंत्र्यांचे बंगला हा नेहमीच सर्वांसाठी चर्चेचा विषय राहिला आहे. काल रविवारी विधानसभेच्या सर्व नेत्यांच्या सदनातील जागा निश्चित झाल्या नंतर आज मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि मंत्र्यांना बंगले वाटप करण्यात आले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या निवास स्थानसाठी प्रसिद्ध असलेला 'वर्षा' बंगला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना सागर बंगला देण्यात आला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांसह मंत्र्याना देखील बंगल्यांचे वाटप करण्यात आले आहे. यात जयंत पाटलांना 'सेवासदन', एकनाथ शिंदे यांना 'रॉयलस्टोन' तर छगन भुजबळांना पुन्हा एकदा 'रामटेक' बंगला देण्यात आला आहे. अशी माहिती एका पत्रकाद्वारे सामान्य प्रशासन विभागाने दिली आहे.

हेही वाचा -महाविकासआघाडीचा भाजपला शह; विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती लांबणीवर

बंगल्याचे आधिचे मालक कोण? -

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मलबार हिल येथील 'सागर' या शासकीय बंगल्याचे वाटप करण्यात आले आहे. आघाडीच्या काळात या बंगल्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि त्यानंतर माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील राहत होते.

जयंत पाटील यांना देण्यात आलेल्या ‘सेवासदन’मध्ये विनोद तावडे यांचे वास्तव्य होते. तर पंकजा मुंडे यांच्याकडे यापूर्वी असलेला ‘रॉयलस्टोन’ बंगला आता एकनाथ शिंदे यांना देण्यात आला आहे.

'मलबार हिल' परिसरातील नारायणराव दाभोळकर मार्गावरील ‘रामटेक’ या शासकीय बंगल्याचे सगळ्यांना आकर्षण असते. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानापेक्षा समुद्रकिनारी असलेला ‘रामटेक’ बंगला नेहमीच उजवा ठरला आहे. मात्र, या बंगल्याचा इतिहास पाहिला तर बरेच नेते या बंगल्यासाठी 'नको रे बाबा रामटेक बंगला' असे म्हणत असतात. आघाडीच्या काळात छगन भुजबळ हे ‘रामटेक’मध्येच राहत होते. मात्र, गेल्या काही वर्षात ‘रामटेक’ बंगल्यात राहणाऱ्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. यामध्ये एकनाथ खडसे, खुद्द छगन भुजबळ, माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत नेते विलासराव देशमुख या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. यामुळे आता पुन्हा एकदा रामटेक बंगला मिळालेल्या भुजबळांना हा बंगला मानवेल का? हे पहावे लागेल.

हेही वाचा -सोशल मीडियावर राजकीय गाणी आजही 'हिट'; चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद

ABOUT THE AUTHOR

...view details