मुंबई - बुली बाई (Bulli Bai App) प्रकरणात उत्तराखंडमधून अटक करण्यात आलेल्या श्वेता सिंग आणि मयंक यांना वांद्रे न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात चार आरोपींना मुंबईच्या सायबर सेलने अटक केली होती. त्यातील एका आरोपीला मुंबईतील न्यायालयाने आधीच पोलीस कोठडी दिली होती. त्याचे नाव विशाल कुमार असे असून उत्तराखंड येथून त्याला अटक केली होती.
बुली बाई’ ॲप प्रकरणात मुंबई पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा एका तरुणाला उत्तराखंडमधील पौडी जिल्ह्यातील कोटद्वार येथून अटक केली आहे. कोटद्वारच्या निमुचौड परिसरातून तरुणाला अटक करण्यात आली आहे. आरोपी तरुण दिल्लीतील एका महाविद्यालयात शिकत असल्याचे सांगण्यात येत आहे. मयंक रावत असे या २० वर्षीय तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मूमध्ये तैनात असलेल्या लष्करातील जवानाचा मुलगा ॲप प्रकरणात आरोपी आहे.
तरुणाच्या अटकेसह ‘बुली बाई’ ॲप प्रकरणी उत्तराखंडमधील ही दुसरी अटक आहे. आरोपी तरुण दिल्ली विद्यापीठाच्या झाकीर हुसेन कॉलेजमध्ये बीएससीचे शिक्षण घेत असून ऑनलाइन क्लासेसच्या निमित्ताने कोटद्वार येथील त्याच्या घरी आला होता.
हे ही वाचा -संघ मुख्यालय दहशतवाद्यांच्या निशाण्यावर.. जैश-ए-मोहम्मदकडून RSS मुख्यालय व परिसराची रेकी
आरोपींची चौकशी केल्यानंतर पोलीस पुढील कारवाई करत आहेत. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने ‘बुली बाई’ ॲप प्रकरणी बंगळुरूमधील २१ वर्षीय तरुणाला अटक केल्यानंतर मंगळवारी उधमसिंगनगर जिल्ह्यातून मुख्य आरोपी महिलेलाही अटक करण्यात आली.