मुंबई - बुलीबाई अॅपच्या ( Bulli Bai App ) माध्यमातून महिलांविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या तिन्ही आरोपींचा जामीन अर्ज वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने फेटाळला ( Bulli Bai Accused Bail Rejected ) होता. त्यानंतर आता या प्रकरणातील पहिला आरोपी विशाल कुमार झा याने मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली ( Vishal Kumar Jha Runs Session Court ) आहे.
बुलीबाई अॅप द्वारे मुस्लिम महिलांसाठी आक्षेपार्ह शब्द वापरुन त्यांचे फोटे आणि त्यांची माहिती ट्विट, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवरुन चोरी येथे टाकली जात होती. 100 हून अधिक महिलांचे फोटो येथे टाकून त्यांच्यावर बोली लावली गेली असल्याचे पोलीस तपासात समोर आले.
मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने ( Mumbai Police Cyber Cell ) गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला. त्यानंतर प्रथम विशाम कुमार झा आणि 5 जानेवारी रोजी उत्तराखंडमधून श्वेता सिंह आणि मयंक रावत या दोघांना या प्रकरणात अटक करण्यात आली. या तिघांनीही न्यायालयीन कोठडी मिळताच त्यांनी वांद्रे येथील दंडाधिकारी न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, तो फेटाळण्यात आला. आता या प्रकरणातील विशाल कुमार झा याने मुंबई सत्र न्यायालयात ( Mumbai Session Court ) जामिनासाठी धाव घेतली आहे.