महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Bulli Bai App Case : बुली बाई ॲप प्रकरणातील आरोपी श्‍वेता सिंगची जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव - बुली बाई ॲप प्रकरण आरोपी जमीन अर्ज

बुली बाई ॲप प्रकरणात ( Bulli Bai App Case ) मुंबई पोलिसांच्या सायबर पथकाने अटक केलेले महिला आरोपी श्‍वेता सिंग बांद्रा कोटाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर श्‍वेता सिंगने ( Sweta Singh Bail Application ) आज मुंबई सत्र न्यायालयामध्ये ( Mumbai District Court ) जामिनासाठी अर्ज दाखल केला असून या अर्जावर उद्या सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.

mumbai
mumbai

By

Published : Feb 1, 2022, 6:22 PM IST

मुंबई -बुली बाई ॲप प्रकरणात ( Bulli Bai App Case ) मुंबई पोलिसांच्या सायबर पथकाने अटक केलेले महिला आरोपी श्‍वेता सिंग बांद्रा कोटाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर श्‍वेता सिंगने ( Sweta Singh Bail Application ) आज मुंबई सत्र न्यायालयामध्ये ( Mumbai District Court ) जामिनासाठी अर्ज दाखल केला असून या अर्जावर उद्या सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.

श्‍वेता सिंगला उत्तराखंडमधून अटक -

बुली बाई ॲप प्रकरणात श्‍वेता सिंग यांना उत्तराखंडमधून मुंबई सायबर सेलने अटक करण्यात आले होते. या प्रकरणात पहिला आरोपी विशाल झा याला बेंगलोरमधून अटक केल्यानंतर विशाल झाच्या माध्यमातून श्‍वेता सिंगला उत्तराखंडमधून अटक करण्यात आले होते. मुंबई पोलिसांनी ७ जानेवारी रोजी स्वताला मुंबईत आल्यानंतर तीन दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली होती. त्यानंतर स्वतःला न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. बांद्रा महानगर दंडाधिकारी न्यायालयाने जामीनअर्ज फेटाळल्यानंतर अखेर श्‍वेता सिंग यांनी मुंबई सत्र न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे या प्रकरणातील पहिला आरोपी विशाल कुमार झा याने देखील सत्र न्यायालयामध्ये जामीन न करता अर्ज दाखल केला आहे या अर्जावर 5 फेब्रुवारी रोजी मुंबई सत्र न्यायालय आपला निकाल देणार आहेत.

काय आहे प्रकरण -

बुली बाई एक ॲप्लिकेशन आहे. जिथे मुस्लीम महिलांचे फोटो लावले जात होते आणि त्यांची बोली लावली जात होती. या ॲपवर आतापर्यंत 102 मुस्लीम महिलांचे फोटो लावण्यात आले होते. या प्रकरणावरुन विविध स्तरांतून अनेक प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. तसेच अनेकांनी या ॲप विरोधात तक्रारीही दाखल केल्या होत्या. ज्यानंतर मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं या आरोपींविरोधात आयपीसी कलम 354D, 509, 500, 153A, 295A, 153B, IT च्या कलम 67च्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपास सुरु केला होता.

हेही वाचा -Nitesh Rane Case Hearing : आमदार नितेश राणे यांना धक्का; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

ABOUT THE AUTHOR

...view details