महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ठाण्यात बांधकाम सुरू असलेल्या टॉवरला आग; कारण अस्पष्ट - ठाणे आग

नौपाड्यातील सोहम ट्रॉपिकल या बांधकाम सुरू असलेल्या उत्तुंग इमारतीच्या अठराव्या मजल्यावर मोठी आग लागल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली.

fire
ठाण्यात बांधकाम सुरू असलेल्या टॉवरला आग

By

Published : Feb 28, 2020, 10:13 PM IST

Updated : Feb 28, 2020, 10:41 PM IST

ठाणे - नौपाड्यातील सोहम ट्रॉपिकल या बांधकाम सुरू असलेल्या उत्तुंग इमारतीच्या 18व्या मजल्यावर मोठी आग लागल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. 22 मजल्यांची इमारत उभारण्याचे काम सुरू आहे. अठराव्या मजल्यावर काँक्रीट स्लॅबच्या बाधंकामासाठी बसवण्यात आलेल्या लाकडी फळ्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवताना अग्निशमन दल आणि ठाणे मनपा आपत्कालीन पथकाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

ठाण्यात बांधकाम सुरू असलेल्या टॉवरला आग

नौपाडा परिसरातील हरी निवास सर्कलनजीक सोहम ट्रॉपिकल ही 22 मजली उंच इमारत उभारण्यात येत आहे. तळमजल्यावर प्रशस्त दुकाने व बँक असून त्याठिकाणी कर्मचारी काम करतात. शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास या इमारतीच्या 18 व्या मजल्यावरील बांधकाम सुरू असताना अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच सुरक्षिततेचा उपाय म्हणून तातडीने इमारतीमधील सर्व नागरिकांना आणि बांधकाम मजुरांना इमारतीबाहेर काढण्यात आले. त्यानंतर घटनास्थळी आलेल्या अग्निशमन दल आणि ठाणे मनपा आपत्ती व्यवस्थापन पथकाने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. हा परिसर वर्दळीचा असल्याने इमारतीच्या सभोवताली बघ्यांची गर्दी जमली होती. अखेर, टीटीएल लिफ्ट आणि ब्रेंटो क्रेन घटनास्थळी दाखल झाली. तोपर्यंत आगीत संपूर्ण बांधकाम साहित्य जळून खाक झाले. दरम्यान, या आगीचे कारण समजू शकले नाही.

Last Updated : Feb 28, 2020, 10:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details