मुंबई -बनावट कागद पत्र बनवून फसवणूक करणाऱ्या बिल्डरला आर्थिक गुन्हे शाखेच्या गृहनिर्माण युनिटने गुरुवारी अटक केली. बिल्डरविरोधात 32 कोटी रुपयांची फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयासमोर हजर केले असता त्यास पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
बनावट कागदपत्र बनवून 32 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या बिल्डरला अटक - Builder arrested for doing cheating
बनावट कागद पत्र बनवून फसवणूक करणाऱ्या बिल्डरला आर्थिक गुन्हे शाखेच्या गृहनिर्माण युनिटने गुरुवारी अटक केली. बिल्डरविरोधात 32 कोटी रुपयांची फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बनावट कागदपत्रे सादर करून आणि फ्लॅट खरेदीदारांची 32 कोटी रुपयांची फसवणूक करून पुनर्विकास प्रकल्पाचा भाग नसलेल्या भूखंडाचे बुकिंग स्वीकारल्याच्या आरोपाखाली मुंबईतील बिल्डरला आर्थिक गुन्हे शाखेच्या गृहनिर्माण युनिटने गुरुवारी अटक केली आहे. आरोपी सचिन खानोलकर (52) याच्यावर फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी सचिन खानोलकर आणि मयुरेश औडेगावकर हे परळ-दादर परिसरात असलेल्या सिद्धिविनायक बांधकामांचे संचालक आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धिविनायक फर्मवर चिंचपोकळी येथील दत्ताराम लाड मार्गावरील श्रीमतुओका हाऊसिंग सोसायटीचे पुनर्विकास आणि सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या पूर्णत: प्रमाणपत्र सीसी (CC) च्या मंजुरीपेक्षा जास्त बांधकाम केल्याचा आरोप आहे. या फर्मने डॉ. बोथेरे यांची 6.32 कोटी रुपयांची फसवणूक केली. शिवाय 51 इतर गुंतवणूकदारांकडून एकूण 32 कोटी रुपयांचे बुकिंग स्वीकारले. पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फर्मने बेकायदेशीरपणे गृहनिर्माण संस्थेचे बांधकाम केले आहे.
हेही वाचा -Maharashtra Monsoon Updates : मॉन्सूनने अर्धा महाराष्ट्र व्यापला.. ५ दिवस जोरदार बसरणार..